जळगाव (विशेष प्रतिनिधी) जिल्ह्यात विविध विभागांकडून गत 5 वर्षात झालेल्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी विधी मंडळाची अंदाजपत्रक समिती, मंगळवारी 3 दिवसांच्या दौर्यावर आली आहे. सकाळी नियोजन भवनात समितीने आढावा घेतला. मनपासह जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध प्रश्नांवर समितीने अधिकार्यांकडून आढावा घेतला.
[ads id='ads1]
जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी अंदाजपत्रक समिती, गठीत करण्यात आली आहे. या समितीत 33 आमदार सदस्यांचा समावेश आहे. ही समिती, जळगाव जिल्हात तीन दिवसीय दौर्यावर आली आहे. मात्र, 33 सदस्यांपैकी केवळ 15 सदस्य उपस्थित होते. तर अन्य 18 सदस्यांनी जिल्हा दौर्याकडे पाठ फिरवली आहे.
या समितीतीत 33 पैकी केवळ 15 सदस्य उपस्थित
यात समिती प्रमुख रणजीत कांबळे, आ. चिमणराव पाटील, आ. संजय गायकवाड, आ. विलास पोतनीस, आ.भरतशेठ गोगावले, प्रकाश सोळंके, आ. कृष्णा खोपडे, आ. माणिकराव कोकाटे, आ. विकास कुंभारे, आ.रईस शेख, आ. डॉ. वजाहत मिर्झा, आ. निलय नाईक, निमंत्रीत सदस्य आ. बळवंत वानखेडे, आ. कपिल पाटील, आ. विनायकराव मेटे यांचा समावेश आहे. प्रारंभी, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी समितीतील सदस्यांचा पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.