चुंचाळे येथे कानबाई मातेला भक्तीमय वातावरणात निरोप...

अनामित
यावल वार्ताहर (सुरेश पाटील) तालुक्यातील चुंचाळे येथे खान्देशची कुलस्वामिनी कानबाई मातेचा उत्सव सालाबादा प्रमाणे मोठ्या भक्तीमय व उत्साहाने साजरा करण्यात आला भजन भारुडे म्हणून भक्तीमय वातावरणात गावातील महिला व ग्रामस्थाच्या उपस्थितीत विसर्जन करण्यात आले.
[ads id='ads1]
याबाबत चुंचाळ्यात मंगळवार दि.१६आँगस्ट रोजी मोठ्या भक्तीभावाने कानबाईची विधीवत स्थापना करण्यात आली खान्देशची कुलस्वामिनी कानबाई स्थापनेच्या एक दिवस अगोदर चौरगांला बाबुच्या काडी लावून वश्रशृंगार परिधान करुन तर काही ठिकाणी नारळाला वस्र परिधान करुन कानबाईची उभारणी स्थापना केली होती त्याच दिवसापासून हिंदू धर्माच्या पारपांरिक चालत आलेल्या रितीरीवाजाला रोठ म्हणून हा सण साजरा केला जातो या सणाला नौकरी निमीत्त बाहेर गावाला गेले आहे ते त्या दिवशी एकत्र येतात यांच्या घरी होते कानबाई मातेची स्थापना नथ्थु दौलत पाटील,उत्तम चैत्राम पाटील,निबा शंकर पाटील, नारायण लक्ष्मण नेवे,मधूकर दोधू सावळे अश्या एकुण पाच घरी कानबाई मातेची स्थापना करण्यात आली होती
स्थापनेच्या रात्री व दुसऱ्या दिवशी श्री समर्थ वासुदेव बाबा भजनी मंडळ भजन गायन करीत कानबाईला गावाबाहेर आणले जाते त्या ठिकाणी महिला,पुरुष,मुली मुले असे सर्वजण यात मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात नंतर वाजत गाजत कानबाईला गाव विहिरीजवळ आनले जाते व विधीवत पुजाविधी करुन पाण्यात विसर्जीत केले जाते यावेळी अरुण कोळी,देवचंद कोळी,सुपडू संदानशिव,वाय.वाय.पाटील, किशोर नेवे,दत्तु नेवे,आबा राजपुत,सरदारसिंग राजपुत,गोकुळ कोळी यासह महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!