महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ ,मुंबई तर्फे पुरस्कार वितरण सोहळ्यात युवा नेता पुरस्कार २०२१ छोटु पाटील यांना देऊन करण्यात आले सन्मानित..

अनामित
निंभोरा.बु।।वार्ताहर (प्रमोद कोंडे) खिरोदा येथील डि.एड. कॉलेज सभागृहात आयोजित महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ , मुंबई तर्फे पत्रकारांना मोफत हेल्मेट वाटप व मुकनायक , जीवन गौरव पुरस्कार कार्यक्रम सोहळा आयोजित करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात युवा नेता पुरस्कार २०२१.छोटु पाटील उर्फ दिनेश गंभीर पाटील यांना महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकुर यांच्या हस्ते प्रदान करुन सन्मानीत करण्यात आले. 
[ads id='ads1]
कार्यक्रमास आ.शिरीष चौधरी, आ.चंद्रकांत पाटील तसेच महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रविण सपकाळे,किशोर रायसाकडा, प्रदिप गायके, डिगंबर महाले, यांची प्रमुख उपस्थिती होती. रावेर तालुक्यातील अगदी छोट्या रेंभोटा गावांत शिक्षण पूर्ण करून समाज सेवा हिच खरी सर्वश्रेष्ठ आहे , 
या म्हणी प्रमाणे तसेच राष्ट्रीय संत तुकाराम महाराज, संत गाडगेबाबा, महात्मा फुले, या थोर महापुरुष मंडळी यांच्या कार्याने प्रेरित होऊन त्यांनी आपल्या परीने गावापासून सामाजिक कार्याची महत्व पूर्ण जबाबदारी घेऊन ती त्यांनी आजवर आपल्याला खिर्डी , तांदलवाडी परिसरात यशस्वीपणे पार पाडत आहेत, 

यांत दुधात साखर म्हणजे त्यांच्या कार्याची महती म्हणून ते 2000 या वर्षी अविरोध रेंभोटा गावाचे सरपंच करुन पदाची माळ समस्त रेंभोटा वासी यांनी त्यांच्या गळ्यात टाकली.व त्यांची समाजाप्रती जबाबदारी आणखीचं वाढून त्यांच्या कडून समाजातील दिन दुबळ्यासह सर्व स्तरांतील लोकांच्या समाज कार्याच्या अपेक्षा ही वाढल्या.छोटू पाटील यांचे मुळ नांव दिनेश गंभीर पाटील .ते छोटु पाटील नावानेच प्रचलीत , हे सुसंस्कृत सुस्वभावी स्वच्छ प्रतिमा निर्मळ प्रेमळ भावना निर्व्यसनी आणि संयमी नेतृत्व आहे,

 ते कोणतीही निर्णय घेण्याच्या आधी दूरदृष्टी ठेवून सक्षम,ठोस पाऊले उचलतात.तसेच त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या वर नितांत श्रध्दा असलेले कट्टर शिवसैनिक मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. श्री.चंद्रकांत पाटील यांचे विश्वास रुपी छत्र त्यांना मिळाल्याने ते आतापर्यंत सर्वात कार्यक्षम, संवेदनशील, कार्यरत समाज कारण, राजकारणातील आदर्श मार्गदर्शक युवा नेते म्हणून त्यांची ख्याती आहे, 

युवकांनी , सहकाऱ्यांनी सुद्धा आपल्या सारखेच निर्व्यसनी असावे असा त्यांचा प्रयत्न आज राजकारणाला एक नवी दिशा देणारा ठरतो यामुळे चं त्यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई पत्रकार संघटनेच्या माध्यमातून युवा नेते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!