यावल (वार्ताहर) आज 1/8/21रोजी यावल कोर्टात राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली त्यात प्रथम मार्गदर्शन केंद्र चे ओपनींग व उदघाटन मा तालुका विधी सेवा समिती चे अध्यक्ष श्री डामरे साहेब यांच्या आदेशाने सर्व प्यारा लीगल व्हालिंटीयार यांच्या कडून करण्यात आले
[ads id='ads1]
नंतर लोक अदालत मध्ये प्रलंबित समजोता करून प्रकरणे निकाली काढले कार्यक्रमाला मा जज श्री बनचरे साहेब, पंच ऍड श्री बाविस्कर, ऍडव्होकेट श्री सोनवणे, यावल वकील संघ अध्यक्ष श्री धीरज चौधरी, ऍडव्होकेट श्री कवडीवले, ऍडव्होकेट अशोक सुरळकर, सर्व वकील संघ, लीगल एड चे झोपे साहेब यांनी परिश्रम घेतले तसेच प्यारालीगल व्हालीनटीयर श्री अशोक तायडे, श्री वारूळकर सर, हेमंत फेगडे, अजय बढे, नंदू अग्रवाल उपस्थित होते त्यात पुढील प्रमाणे प्रकरण निकाली काढून बँक ची कर्ज थकबाकीदार यांच्याकडून वसुली केली गेली
