रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे) रावेर तालुक्यातील पाडला खुर्द. येथील तीन वर्षांपूर्वी पत्नीला पळवून नेल्यानंतर झालेल्या वादाच्या खुमखुमीनंतर आठ संशयीतांनी एकाचा खून करून मृतदेह जमिनीत गाडला मात्र नातेवाईकांमध्ये उफाळलेल्या वादाची कुणकुण रावेर पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर रावेरचे निरीक्षक रामदास वाकोडे यांनी तपासचक्रे गतिमान करीत खुनाचा उलगडा करीत सात आरोपींच्या शनिवारी मुसक्या आवळल्या. या घटनेत प्रताप खुमसिंग भील (46) यांचा खून झाला. विशेष बाब म्हणजे या खुनात तीन वर्षांपूर्वी पळून गेलेल्या पत्नीचाही आरोपींमध्ये समावेश आहे.
[ads id='ads1]
पत्नीला पळवून नेल्याच्या कारणावरून केला खून
रावेर पोलिसांच्या माहितीनुसार, मयत प्रताप खुमसिंग भील (46) यांची पत्नी सागरीबाई यांना सुमारे तीन वर्षांपूर्वी लक्ष्मण वेरसिंग भील याने पळवून नेल्याने प्रताप व लक्ष्मण यांच्या टोकाचे वाद झाले होते. या वादाच्या खुमखुमीतून 21 ऑगस्टच्या सुमारे 15 दिवसांपूर्वी सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या पाडला खुर्द शिवारात नागोरी नदीचे बाजुला असलेल्या मीराबाई गोविंदा चौधरी यांचे शेतात प्रताप भील यांचा गळा आवळून तसेच टोकरांनी डोक्यावर मारहाण करून खून करण्यात आला व मृतदेह विहिरीत टाकण्यात आला होता व नंतर अन्य आरोपींनी मृतदेह विहिरीतून काढत जमिनीत दफन केला होता.
