I don't know हा विषय इतरांसाठी किती महत्वाचा आहे पण मला फार महत्त्वाचा वाटतो तो विषय आहे आपल्याकडे आपल्या पूर्ण तालुक्यात जरी आपण विचार केला क्षयरोगाच्या रुग्णाला तरी आरोग्य यंत्रणा ने पूर्णपणे वाळीत टाकलेला आहे.
[ads id='ads1]
आशा वर्कर इतर ठराविक कर्मचारी सोडले तर बाकी कुठेही यांची दखल घेतली गेली नाही हे प्रकर्षाने म्हणावं लागेल. सरकारी स्तरावर टी.बी या आजाराला समूळ नष्ट करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम हाती घेत असताना एक कार्यक्रम माझ्या लक्षात येतो की केंद्राकडून रुग्णांना पाचशे 500 रुपये मिळतात , समुपदेशनासाठी एक व्यक्ती,तर प्रश्न असा पडतो आपल्याकडील अशी किती रुग्ण आहेत ज्यांना हे पैसे मिळाले आहेत? हा आकडा नाही बरोबर चा आहे कुठेतरी नोकरशाही उदासीन आहे याचा अर्थ असा होतो.
आपण सगळ्यांनी या विषयाकडे गांभीर्याने बघितले गेले पाहिजे. एक अधिकारी समुपदेशनासाठी दिला जातो किती लोकांना यांनी समुपदेशन दिल या सर्व प्रश्नाचे उत्तर आता आपल्याला विचारण्याची वेळ आली आहे. सन्माननीय अँड. पंकज गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या विषयाला हाती घेत आहोत. संबंधित पंचायत समिती, जिल्हा परिषद, प्राथमिक आरोग्य केंद्र या सगळ्यांना प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे व आम्ही विचारणारच.
जितेंद्र राठोड
उपतालुका अधिक्षक युवा सेना शिरपूर
जिल्हाध्यक्ष भारतीय राष्ट्रीय युवा परिषद धुळे
