विवरे बु॥ ग्रामपंचायतीने ग्रामसभेत केली विज वितरण कंपीनीवर दोन कोटी कराची आकारणी ! या निर्णयाने विज कंपनीची बत्ती गुल ?

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

कर आकारणी हा ग्रामपंचायतीचा अधिकार  : वासुदेव नरवाडे

तालुक्यासह जिल्हयातील पहिला निर्णय ....

जोर का झटका धिरे से लगे...

 या निर्णयाने विज कंपनीची बत्ती गुल ?


रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे) गेल्या आठवडयात विज वितरण कंपनीने धडक कारवाई करित गावातील पाणी पुरवठा विज पंप व पथदिव्यांचा विज पुरवठा खंडीत केला. यामुळे गावातीत पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून पथ दिवे बंद असल्याने गाव अंधारात आहे. विज वितरण कंपनीने अधिकाराचा वापर करून विज खंडीत केली. आता आम्ही ग्रामपंचायतीचा कर आकारणी व वसुलीचा अधिकाराचा वापर करित विज वितरण कंपनीच्या आमच्या हददीतील विद्युतखांब, रोहीत्र, टॉवर, उच्च दाब वाहीन्यांवर कर  आकारणी करण्याचा प्रस्ताव माजी सरपंच तथा विदयमान सदस्य वासुदेव नरवाडे यांनी ग्रामसभेत मांडला . यानुसार विज वितरण कंपनीकडून दोन कोटीचा कर वसूल करण्यात येणार असल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात सुमारे दोन कोटीच्या कराची भर पडणार आहे . यामुळे विज वितरण कंपनीला शॉक बसणार आहे.

        विवरे बु॥ ग्रामपंचायतीची ग्रामसभा दोन वर्षानंतर सरपंच युनुस तडवी यांच्या अध्यक्षते खाली सोमवारी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या ग्रामसभेत जैविक विविधता समिती , पाणी पुरवठा व स्वच्छता समिती , दक्षता समीती यांचे गठण करण्यात येवून तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदासाठी तीन नावे असल्याने गोंधळ उडाला. विविध समस्या व विषयांवर चर्चा होऊन सभा संपन्न झाली.

.... यांची होती उपस्थिती....

        ग्रामसभेला सरपंच इनुस तडवी, उपसरपंच भाग्यश्री पाटील , माजी सरपंच वासुदेव नरवाडे , रेखा गाढे , ललीता पाचपांडे, युसुफ खाटिक , नौशाद बी इस्माईल , विनोद मोरे , विपीन राणे , पुनम बोंडे , शिवाजी पाटील , निलीमा सणंसे, दिपक राणे, ग्रामविकास अधिकारी अरविंद कोलते , भागवत महाजन , भुषण बोंडे , इस्माईल खान , अरुण पाटील , पशुवैद्यकिय अधिकारी श्री शेळके , जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक , अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

जसा विज वितरण कंपनीला वसुलीचा अधिकार आहे . तसा ग्रामपंचायत स्वायत्ता संस्था असल्याने आपल्या हददीतील व्यवसायीकांवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १२४कर फी नियम ६६ भाग ७ ( ब ) अन्वये महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीवर कर लावण्याचा अधिकार आहे . या अधिकाराचा वापर करून विवरे बु॥ हददीतील विज वितरण कंपनीच्या मालमत्ते वर रेडीरेकर दर प्रणाली नुसार कर व सेवा कर लावण्याचा प्रस्ताव ग्रामसभे  समोर ठेवून मंजूर करण्यात आला. विज वितरण कंपनीच्या दंडेल शाहीला जशाच तसे उत्तर देणे गरजेचे होते. म्हणून विद्युत खांब , रोहीत्र , टॉवर , तार या मालमत्तेवर जागेचा वापर करित असल्याने सुमारे दोन कोटी रुपयांच्या कराची आकारणी करण्यात येवून त्वरित बिल बजावून कर भरण्यासाठी १५ दिवसाचा अल्टीमेटम देवून पुढील कारवाई करण्यात येईल. तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनीही आपल्या अधिकाराचा वापर करून विज कंपनीच्या मालमत्तेवर कर आकारणी करुन ग्रामपंचायतीला आर्थिक मजबुत करावे.

वासुदेव नरवाडे ( ग्रा.पं.सदस्य )

माजी तालुकाध्यक्ष 

सरपंच विकास परिषद,रावेर

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!