अंगणवाडी सेविकांकडून निकृष्ठ मोबाईल फोन केले परत..

अनामित
सिन्नर वार्ताहर (सुशिल कुवर) शासनाने अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाइल फोन हे निकृष्ट दर्जाचे असून ते वापरण्यास अंगणवाडी सेविकांना त्रास होत आहे. त्यातील पोषण ट्रॅकर अ‍ॅप हे इंग्रजी भाषेत असल्याने अंगणवाडी सेविकांना ते समजत नाही. त्यामुळे ते मोबाइल परत घ्यावेत, या मागणीसाठी तालुक्यातील 525 अंगणवाडी व आशासेविकांनी आपले मोबाइल शासनाला परत करत एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रकल्प अधिकार्‍यांना निवेदन दिले.
[ads id='ads1]
सुमारे दोन वर्षांपूर्वी दिलेले हे मोबाइल त्रासदायक ठरू लागल्याने तालुक्यातील अंगणवाडी व आशा सेविका 525 मोबाइल हँडसेट घेऊन पंचायत समितीतील बालविकास प्रकल्प अधिकार्‍यांच्या कार्यालयात आल्या. मोबाईल जमा करून घेण्यास अधिकार्‍यांनी टाळाटाळ केल्यानंतर महिलांनी एक बॉक्समध्ये आपापल्या बिटचे मोबाईल टाकून ते बॉक्स अधिकार्‍यांकडे जमा केले.

मोबाईल दुरुस्तीसाठी भुर्दंड
सरकारी कामासाठी देण्यात आलेल्या या मोबाइलची दोन वर्षे मुदत होती, ती संपली आहे. मोबाइल अवघ्या दोन जीबी रॅमचा आहे. त्या तुलनेत लाभार्थ्यांची भरायची माहिती खूप जास्त आहे. यामुळे मोबाइल हँग होतात. लवकर गरम होतात. अतिशय निकृष्ट दर्जाचे हे मोबाइल असून दुरुस्तीसाठी तीन ते चार हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. हा खर्च अंगणवाडी सेविकांकडून घेतला जात आहे.

पोषण ट्रँकर अ‍ॅप डाऊनलोड होईना
लाभार्थ्यांची माहिती भरण्यासाठी सरकारने अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर अ‍ॅप दिले आहे. मात्र, सरकारने दिलेल्या मोबाइलमध्ये हे अ‍ॅप डाऊनलोड होत नाही. त्यामुळे सेविकांना आपल्या खासगी मोबाइलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करावे लागत आहे. हे अ‍ॅप इंग्रजीमध्ये असल्याने ते हाताळण्यास अडचण येत आहे. त्यामुळे हे अ‍ॅप मराठीत उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!