निंभोरा (प्रमोद कोंडे) संभाव्य होणारी जीवित हानी टाळण्यासाठी जीर्ण अवस्थेत असलेली पाणी पुरवठा बंद असलेली टाकी पाडण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी जोर धरत असून रावेर तालुक्यातील निंभोरा बु.येथील गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी जि. प. ने सदरील टाकी 1972 साली बांधली सदर हू टाकीस 49 वर्ष झाले.
[ads id='ads1]
या टाकीचा वापर बंद झाल्याने व टाकीचे बांधकाम उखडले गेले असुन ती खिळखिळी झाली आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी ही टाकी कोसळण्याची शक्यता ग्रामस्थ व्यक्त करीत आहे. परंतू टाकी पाडून टाकण्याच्या मागणीकडे ना शासन ना पुढारी लक्ष देत नसल्याने जीर्ण टाकी उभी आहे.
जोरदार पाऊस, किंवा वादळी वाऱ्यात टाकी कोसळली तर गावातील मुख्य रस्ता, जवळ धार्मिक स्थळे, बाजार पेठ वर्दळीचा रस्ता, तसेच टाकीखाली व जवळ राहणाऱ्या ग्रामस्थांचा विनाकारण जीव जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासाठी जुनी झालेली पाण्याची टाकी पाडण्यात यावी.अशी मागणी परिसरातून होत आहे. या टाकीचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. हा संभाव्य धोखा टाळण्यासाठी कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.पर्यायी पाण्याची पुरवठा करणारी नवीन टाकी दसनूर रस्त्यावरील प्लॉट एरियात बांधली असुन पाणी पुरवठा त्या टाकीवरून गावाला होत आहे.