भादली ता. जळगाव प्रतिनिधी (गोविंदा चिनावले) भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या गौरवशाली अमृतमहोत्सवी वर्षा निमित्ताने देशभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, या निमित्ताने भारत सरकारच्या माहिती आणि सूचना प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणे, अंतर्गत गित व नाटक विभाग व क्षेत्रिय लोकसंपर्क ब्युरो, जळगाव यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यात दि.२३ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट दरम्यान ही जागर यात्रा फिरत आहे,या जागर यात्रेचे भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या वतीने ठिक - ठिकाणी स्वागत करून गाव पातळीवर सांस्कृतिक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात येत आहे, याच पार्श्वभूमीवर भादली:बु (ता.जळगाव) या गावात जागर यात्रेच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला,
[ads id='ads1]
यात भारत सरकारच्या गित व नाटक विभागाची मान्यता प्राप्त कलासंस्था दिशा समाज प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेचे पथनाट्य प्रमुख विनोद ढगे आणि त्यांचे सहकारी सचिन महाजन, दुर्गेश आंबेकर, अवधूत दलाल, अरविंद पाटील, मोहीत पाटील, आकाश धनगर, विलास पाटील यांच्या कलापथकाद्वारे सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा जागर करण्यात आला तसेच देश भक्ती, देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता व आत्मनिर्भर भारताचा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला गेला, या कार्यक्रमास गावकऱ्यांसह शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच संदीप कोळी होते, तर भादलीच्या पोलीस पाटील राधिका ढाके यांनी कलापथकाचे स्वागत केले, कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी युवा परीषदेचे जिल्हा समन्वयक इरफान पिंजारी, जळगाव तालुका सचिव विलास पाटील, ग्रामपंचायत सदस्य जान अंजली गुरु संजना, विजय कावळे, गोविंदा चिनावले, कौस्तुभ झांबरे, समाधान कोळी, सचिन मोरे यांचे सहकार्य लाभले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ ढाके यांनी केले