भुसावळ - दिपनगर प्रकल्प मधून स्थानिक कंत्राटी कर्मचाऱ्यांना राजकीय दबावापोटी काहीही कारण नदेता कमी करण्यात आल्यामुळे त्यांना पुन्हा कामावर घेऊन स्थानिक गरजूंना सदर प्रकल्पात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा वरणगांव यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
[ads id='ads1]
सदर आंदोलना ठिकाणी खासदार रक्षाताई खडसे व आमदार संजय सावकारे यांनी भेट देऊन ६६० मेगा व्हॅट प्रकल्पाचे सी.जी.एम रोकडे साहेब व ५०० मेगा व्हॅटचे सी.जी.एम राठोड साहेब यांच्यासोबत चर्चा करून कामावरून कमी करण्यात आलेल्यांना २ दिवसाच्या आत कामावर घेण्यात यावे याबाबत सांगितले असता त्यांना कामावर घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.