यावल वार्ताहर (सुरेश पाटील) यावल नगरपालिका संचलित सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.के.पाटील सर यांना शिक्षक भारती तर्फे उपक्रमशील शिक्षक पुरस्कार देण्यात आला यावेळी एम.के. पाटील सर यांच्या सौभाग्यवती सौ.पाटील सुद्धा उपस्थित होत्या.सदरील पुरस्कार शिक्षक भारती संघटनेचे आमदार माननीय कपिल पाटील यांच्या हस्ते जळगाव येथे कांतीबाई हॉल या ठिकाणी आयोजित एका भरगच्च समारंभात देण्यात आला.
[ads id='ads1]
सदरील पुरस्कार वितरण सोहळा दि.25 रोजी संध्याकाळी पाच वाजता जळगाव येथे आयोजित करण्यात आला.यावेळी सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील तसेच शिक्षण क्षेत्रातील अनेक पदाधिकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वस्तरातून एम.के.पाटील सरांचे कौतुक केले जात आहे.सन्माननीय व्यवस्थापक मंडळाने सुद्धा सरांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.