जळगाव - सर्व शक्ती सेना कार्यालयात जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. संजय मोरे सर्व शक्ती सेना, महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष तथा, राष्ट्रीय मानव अधिकार, महाराष्ट्र राज्य ,उपाध्यक्ष हे होते. प्रथम आदिवासीं क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला प्रा. संजय मोरे आणि कृष्णा सावळे, अँड अजय कोळी यांच्या हस्ते, पुष्पहार अर्पण करण्यात आला.
[ads id='ads1]
त्या प्रसंगी प्रा. संजय मोरे सर्व शक्ती सेना ,महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, आदिवासीं समुदायाच्या अधिकाराच्या रक्षणार्थ संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने दरवर्षी 9 ऑगस्ट हा दिवस विश्व मूलनिवासी, दिन म्हणुन साजरा केला जातो.भारत देशामध्ये, हा दिवस ' आदिवासीं दिन ' म्हणुन साजरा केला जातो.9 ऑगस्ट 1993 मध्ये ,युनोच्या आमसभेत आंतर राष्ट्रीय आदिवासीं वर्ष, म्हणुन जाहीर केले गेले.
1994 ते 2005 'आदिवासीं दशक 'म्हणुन साजरे करण्यात आले .तर 2005 ते 2013 दुसरे 'आदिवासीं दशक ' वर्ष म्हणुन साजरे करण्यात आले .आदिवासीं समुदायाची सस्कृति, शिक्षण,आरोग्य, मानवाधिकार, प्रयावरण, आर्थिक आणि सामाजिक विकासा संदर्भात जे मुलभूत प्रश्न, आहेत ते आतंरराष्ट्रीय , परस्पर सहयोगाने सोडविण्यासाठी प्रयत्न करणे , हा या आदिवासीं, दशकामागील मुख्य उद्देश होता. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या आदिवासीं, क्रांतीकारकाची संख्या खुप मोठी आहे .पण इतिहासात उपेक्षित राहिले. काही आदिवासीनी आत्मसन्मानाच्या चळवळी, राबविल्या.
काहींनी आपल्या धर्म- सस्कृतीवर होणारे , परकियाचे आक्रमण थोपविण्यासाठी उठाव केले.काहींनी शोषणा विरुध्द, विषमते विरुध्द,लढे उभारले.ज्या ज्यावेळी ,जंगल,पहाडातील आदिवासीं , जमातीचे स्वातंत्र,अस्तित्व, अस्मिता, संस्कृति धोक्यात आली.त्यावेळी , हिंदुस्थानातील आदिवासींनी उठाव केला. ब्रिटिशांना प्रथम या आदिवासीं जमातीशी लढा द्यावा लागला. हिंदुस्थानच्या निरनिराळ्या, भागात इंग्रजाच्या विरुध्द , लढ्यात क्रांतीकारक बाबा तिलका माजी केरळ, बिरसा मुंडा, वर्मा पद्यसी, तिर्थसिंह, बुधू भगत, रांमजी भागरा, रामा किरवा,गोविंद खाडे, कुवरसिंह वसावा, भिमानाईक ,शंकर शाह, रघुनाथ शाह, ख्वाजा नाईक , विरप्पा, गगानारायन चक्र बिशोई, तंटत्या भिल, तानाभगत, राणी दुर्गावती,राणी गायडीनुल,
झलकारीबाई, भानुदास कचारी,आदी आदिवासीं क्रांतीकारकाचे योगदान,महत्त्वाचे आहे .देशाला स्वातंत्र्य मिळून 74 वर्षाचा, कालखंड उलटुन गेला, तरी आदिवासींची दुरावस्था, संपलेली नाही. देशाला स्वातंत्र्य ,मिळाल्यावर सर्व उपेक्षित, विकास होणे अपेक्षित, होते , पण वास्तवात तसे झाले नाही. आज ही अतिदुर्गम ,भागात राहणाऱ्या आदिवासीं पर्यंत, वीज,पाणी,रस्ते,या सारख्या जीवनावश्यक, सुविधाही पोहचलेल्या नाहीत.
आदिवासीचां आत्मसन्मान जांगविण्यासाठी , अत्स्मिता जागर करण्यासाठी, एकसंघ होण्यासाठी आजचा 9 ऑगस्ट हा आदिवासीं दिवस महत्त्वपूर्ण ठरतो. असे , आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले. या कार्यक्रमाला प्रा. संजय मोरे सर्व शक्ती सेना ,महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष तथा, राष्ट्रीय मानव अधिकार ,महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, प्रा .हर्षवर्धन भालेराव, प्रा. सुनील तायडे, प्रा. अशोक सांगवीकर, अँड अजय कोळी, कृष्णा सावळे, गजानंद काडेले,विनोद सपकाळे, सोनु सूर्यवंशी, विनोद ठाकरे, सचिन सुरवाडे, अभिजीत तायडे, युवराज कोळी, ईत्यादि उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा सावळे यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन काडेले यांनी मानले.