Raver Breaking - आमदाराकडे हनुमान मंदिराचे सभामंडप मागणीसाठी गेलो होतो ; ग्रामसेवकाच्या तक्रारीसाठी नाही : सरपंच इनुस तडवी

अनामित
विवरे ता.रावेर (प्रतिनिधी) : विवरे बु॥ गावातील हनुमान मंदिराच्या सभा मंडपाची ग्रामस्थांची मागणी असल्याने त्यांचे आग्रहास्तव आमचे पॅनल प्रमुखां सोबत सल्ला मसलत करून आमदार शिरीष चौधरी यांच्या कडे कामाच्या मागणीचा प्रस्ताव घेऊन गेलो. यातही काहींनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला 
[ads id='ads1]
व मी ग्रामविकास अधिकारी यांच्या तक्रारी करून बदलीची मागणी केल्याची खोटी बातमी पसरविण्यात आली असल्याचे सरपंच इनुस तडवी यांनी सांगितले.
 ग्रामविकास अधिकारी अरविंद कोलते यांची काम करण्याची पद्धत चांगली असल्यामुळेच दुसऱ्यांदा बदली होवून ते विवरे बु॥ येवून दोघ गाव सांभाळत आहे. 

विवरे बु॥ ला पुर्ण वेळ मिळावा यासाठी विवरे खुर्द गावाचा अतिरिक्त कारभार काढून घेण्यात यावा . चांगले काम करित असतांना ग्रामविकास अधिकारी यांच्या बाबत तक्रार करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. पण काही विघातक वृत्तीचे लोकांना सहन होत नसल्याने संभ्रम निर्माण करण्याच्या उचापती सुरू आहे. गावाच्या विकासासाठी सत्ताधारी पॅनल प्रमुख वासुदेव नरवाडे यांचे नेतृत्वाखाली आमचा नऊ जणांचा गट पक्का आहेच .यात शंका नाही. 

विरोधकांनी व्यक्ती विरोधाचे राजकारण करण्यापेक्षा विकासाचे राजकारण करावे. तसेच लावालावी पेक्षा जनतेच्या कामावर लक्ष द्यावे. विरोधकांनी माझ्या नावाचा वापर करून जनतेची दिशाभुल करण्याचा प्रयत्न करू नये. असेही सरपंच इनुस तडवी यांनी बोलतांना सांगितले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!