३६० बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदविलेल्या आराध्याचे नाशिकच्या पालकमंत्री मा. ना. छगन भुजबळ यांच्याकडून कौतुक..

अनामित
नाशिक वार्ताहर (सुशिल कुवर) ७५ व्या स्वातंत्र्य दिनी अडीच वर्षीय कु. आराध्या जयराम गावित रा. तोरणडोंगरी ता. सुरगाणा जि. नाशिक या लहान चिमुकलीने भारतातील संपूर्ण राज्याच्या राजधान्या केवळ ४३ सेंकदात सांगून ३६० बुक ऑफ वर्ड रेकॉर्ड मध्ये आपले नाव नोंदविला आहे. या तिच्या कौशल्याबद्दल आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड रजिस्टर कंपनीने ने तिच्या या अनोख्या बौधिक कामगिरीची दखल घेऊन नोंद केली.
[ads id='ads1]   
त्याबद्दल राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. छगन भुजबळ  तसेच ३६० बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे सी.ई.ओ मा. श्री. राहुल बनसोडे यांनी कु.आराध्या गावितला प्रमाणपत्र, मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. तसेच तिला पुढील भावी वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जयराम गावित, अनिता गावित , संजय वाघ, रामेश्वर साबळे, अक्षय गांधी, सुयोग वाघ, उमेश भोये, अमोल शिरसाठ उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!