पाल ता रावेर वार्ताहर (सुरेश पवार) दिनांक 14 ऑगस्ट 2021 रोजी सातपुडा विकास मंडळ पाल संचलित कृषी विज्ञान केंद्र पाल व कृषी तंत्र विद्यालय पाल यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाज्या महोत्सव कृषी विज्ञान केंद्र पाल येथे आयोजित करण्यात आला होताा
[ads id='ads1]
कार्यक्रमाचे उद्घाटन श्री शिरिष चौधरी आमदार रावेर यावल विधानसभा मतदार संघ यांच्या हस्ते करण्यात आले तसेच बचत गटातील महिलांना परसबाग भाजीपाला मिनी कीट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांनी व कृषी विज्ञान केंद्र पाल व कृषी तंत्र विद्यालय पाल यांनी रानभाज्यांची प्रदर्शनी मांडली होती
आमदार श्री शिरीष चौधरी यांनी रानभाज्यांचे महत्त्व व प्रचार-प्रसार करण्याबाबत मार्गदर्शन केले श्री कुरबान तडवी उपसंचालक आत्मा जळगाव यांनी रानभाज्या व कृषी विषयक योजना बाबत मार्गदर्शन केले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री अजित पाटील सचिव सातपुडा विकास मंडळ पाल श्री शेखर पाटील गटनेता पंचायत समिती यावल श्री कामील तडवी श्री पिंटू पवार श्री मयूर भामरे तालुका कृषी अधिकारी रावेर श्री महेश महाजन प्रमुख शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र पाल व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यक्रमाला गावातील शेतकरी शेतकरी महिला बचत गटाच्या महिला कृषी निविष्ठा वितरक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री महेश महाजन प्रमुख शास्त्रज्ञ व सूत्रसंचालन डॉ धीरज नेहेते कृषी विज्ञान केंद्र पाल यांनी केले.
