यावल वार्ताहर (सुरेश पाटील) राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता. 15ऑगस्ट आणि26जानेवारी या दिवशी अनेकजण राष्ट्रध्वज विकत घेऊन मोठ्या अभिमानाने मिरवतात;मात्र हेच कागदी आणि प्लास्टिकचे छोटे-छोटे राष्ट्रध्वज त्याच दिवशी रस्त्यावर, कचर्यात किंवा गटारात पडलेले आढळतात.
[ads id='ads1]
प्लास्टिकचे ध्वज लवकर नष्टही होत नाहीत, त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजाची विटंबना पहावी लागते,तसेच ‘प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणे ’हे' कायदाबाह्य ठरते.तरी स्वातंत्र्यदिनाच्या दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची अशा प्रकारे होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पाऊले उचलावीत,या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनास निवेदन देण्यात आले.तहसील कार्यालयात नायब तहसीलदार आर.के.पवार यांना आणि पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना निवेदन देण्यात आले.या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सर्वश्री धीरज भोळे,चेतन भोईटे यांच्यासोबत विशाल पाटील, जितन धनगर,धनराज कोळी, हर्षल धनगर,वैभव कोळी,हर्षल भोईटे आणि किरण बारी हे धर्मप्रेमी उपस्थित होते.
दुकानातून आणि ‘ऑनलाईन’ पद्धतीने तिरंग्याच्या रंगातील ‘मास्क’ची विक्री करणार्यांवर कायदेशीर कारवाई करा
यंदा दुकानातून,तसेच ‘ऑनलाईन’ पद्धतीने तिरंग्याच्या रंगातील ‘मास्क’ची विक्री होत असल्याचे आढळून आले आहे.अशोक चक्रासह तिरंग्याचा मास्क बनवणे आणि वापरणे,हा ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा अवमानच आहे.असे करणे हे ‘राष्ट्रीय मानचिन्हांचा गैरवापर रोखणे कायदा1950’,कलम 2 व 5 नुसार;तसेच ‘राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971’चे कलम2नुसार आणि ‘बोधचिन्ह व नाव(अनुचित वापरास प्रतिबंध)अधिनियम 1950’ या तिन्ही कायद्यांनुसार दंडनीय अपराध आहे.
या संदर्भात खालील मागण्या आहेत
1. शासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी प्रबोधन करणारी कृती समिती स्थापन करावी.त्यामध्ये हिंदु जनजागृती समितीचाही समावेश करावा, अशी विनंती आहे.समिती या राष्ट्रसेवेस तत्पर आहे.
2.जिल्ह्यात कुठेही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचे उत्पादन आणि त्याची विक्री होते का ?,याची खात्री करावी.असे होत असल्यास संबंधित उत्पादकांवर त्वरित कारवाई करण्यात यावी.असे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात हिंदु जनजागृती तर्फे प्रशांत जुवेकर
यांनी नमूद केले आहे.