"माझी शेती माझा सात बारा मीच करणार माझा पिकपेरा" शेतकरी करणार आता बांधावरूनच पिक पाहणी.

अनामित
खिर्डी बु वार्ताहर (प्रमोद कोंडे) खिर्डी मंडळात ' ई पिक पाहणी ' प्रात्यक्षीकाला खिर्डी गावापासुन प्रारंभ झाला असुन.महाराष्ट्र शासनाच्या महसुल व वनविभाग यांचे कडील शासन निर्णय क्र.जमीन /2018/प्र.क्रं.92(भाग 1)ज.1अ दि.30.जुलै 2021.च्या परिपत्रकानुसार मा.अभिजीत राऊत जिल्हाधिकारी जळगांव.यांचे मार्गदर्शनाखाली तसेच मा.रविंद्र भारदे सा.उपजिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय समन्वयक जळगांव.मा.कैलास कडलग उपविभागीय अधिकारी फैजपुर. उषाराणी देवगुणे तहसिलदार रावेर. यांच्या मार्गदर्शनाखाली या महसुली वर्ष 2021/2022 पासुन 'ई पिक पाहणी ' यास सुरुवात झाली आहे.
[ads id='ads1]
जिल्ह्यासाठी मोबाईल अँप मधुन पिक पाहणी भरण्यासाठी दि.15. आँगस्ट 2021 नंतर उपल्ब्ध होणार आहे.शेतकरी खातेदार यांना या योजनेचा लाभ घेता यावा या करीता खिर्डी मंडळातील खिर्डी गावांपासुन डेमो अँप व मुख्य अँप द्वारे 'ई पिक पाहणी' भरणे व ते अँप डाऊनलोड करुन घेण्याचे प्रशिक्षण खातेदार यांना नुकतेच देण्यात आले. 

याबाबत शेतकरी खातेदारांना प्रत्यक्ष शेतात प्रात्याक्षिक दाखविण्यात आले.व शेतकरी खातेदारांनी स्वतः पिक पाहणी माहीती अँपवर भरुन घेतली. 15/08/2021 ते 15/09/2021.या कालावधीत 'ई पिक पाहणी' अँपच्या मदतीने खरीप हंगामातील पिकपेरा स्वतः नोंदवुन घ्यावे असे आवाहान करण्यात आले. याकरीता गावांतील शेतकरी खातेदारांचे व्हाटस अप ग्रुप तयार केले आहेत.

तरी जास्तीत जास्त शेतकरी खातेदारांनी सदर अँपचा लाभ घ्यावा असे आवाहान महसुल विभागाकडुन करण्यात येत आहे. या वेळी मंडळातील मंडळाधिकारी मिना तडवी,खिर्डी तलाठी एफ. एस. खान, कोतवाल अनंत कोळी, खिर्डी सरपंच गफुर कोळी, ग्रामसेवक महाजन, ग्रामसेवक कोळी, प्रगतीशील शेतकरी खातेदार देवराम कोचुरे, मनोहर मोतीराम सुपे, विजय भागवत कोळी, जितेंद्र फालक, मधुकर तावडे, पुरी येथील पोलिस पाटील किरण पांडुरंग पाटील, व भामलवाडी पोलिस पाटील प्रदीप पाटील, या सर्वांनी ' ई.पिक पाहणी ' अँपचे प्रशिक्षण घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!