बागलाण - दि. १५ ऑगस्ट २०२१ रोजी आज संपूर्ण देश स्वातंत्र्योत्सव साजरा करत असताना वंचित बहुजन आघाडीच्या वतिने, आदिवासी (भिल्ल) समाजासाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या 'दफनभूमी' मिळणेसाठीच्या विषयावर वंचित बहुजन आघाडीने बागलाण तहसिल कार्यालयावर 'तिरडी मोर्चा' काढत शासनाचे लक्ष वेधले.
[ads id='ads1]
देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे पूर्ण झाली, तरी आजही आदिवासी समाजाला मेल्यानंतर पुरण्यासाठी जागा उपलब्ध होत नसेल तर याइतकी शोकांतिक बाब नाही. या कारणात्सव आजपर्यंतच्या सरकारांनी आदिवासी समाजाविषयी दाखवलेल्या उदानसिनतेचा निषेध म्हणून आज स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर हा ऐतिहासिक 'तिरडी मोर्चा' काढत पुढील मागण्यांसाठी निवेदन सादर करीत आहोत.
मागण्या :
१) आदिवासी (भिल्ल) समाजासाठी प्रत्येक गावागावात स्वतंत्र 'दफनभूमी'साठी कायदेशीर धोरणात्मक तरतूद होऊन तात्काळ अंमलबजावणी व्हावी.
२) भील्ल समाजावर परंपरागत लादण्यात येणारी अतिशय अन्यायकारक असणारी सालदारकीची पद्धत बंद करण्यात यावी.
३) आदिवासी (भिल्ल) समाजाच्या घरकुलांचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा.
४) भिल्ल समाजाची आर्थिक उन्नती व्हावी, जीवनमान सुधारावे यासाठी विशेष आर्थिक उपाययोजना करण्यात याव्यात.
५) अनु. जाती, जमातीच्या विकासासाठी शासकीय, निमशासकीय मोठ्या आस्थापनांबरोबरच खाजगी (MNC's, TNC's) आस्थापनांमध्येही नोकरीच्या जागा आरक्षित ठेवाव्यात.
या मागण्यांचा शासनाने गांभीर्यपूर्वक, संवेदनशीलपणे विचार करुन तात्काळ पूर्तता करावी अशी मागणी करण्यात आली.