यावल वार्ताहर (सुरेश पाटील) रविवार दि.15 ऑगस्ट2021 रोजी यावल शहरासह संपूर्ण देशात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, लोकशाही राज्यात प्रत्येक नागरिकांला देशहितावर आधारित,राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक,धार्मिक इत्यादी विविध कार्यक्रम साजरे करण्यासाठी स्वातंत्र्य मिळाले आहे.
[ads id='ads1]
परंतु यावल नगर परिषदेत रविवार दिनांक 15 ऑगस्ट 2021या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी यावल नगर परिषद कार्यालयात विद्यमान नगराध्यक्षा सौ.नोंशाद तडवी,माजी नगराध्यक्ष दीपक बेहेडे यांच्यासह काही मोजक्या नगरसेवकांच्या व नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या उपस्थित झेंडा वंदन कार्यक्रम संपन्न झाला.
तर यावल नगरपरिषद संचलित सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात रविवार दिनांक15ऑगस्ट 2021रोजी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल वसंतराव पाटील यांच्यासह त्यांचे समर्थक नगरसेवक आणि सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थित झेंडावंदन कार्यक्रम संपन्न झाला.
यामुळे यावल नगर पालिका राजकारणात माजी माजी नगराध्यक्ष यांचे उघडपणे दोन गट निर्माण झाले असल्याचे यावल करांच्या निदर्शनात आले आहे.