रावेर : तालुक्यातील विटवे येथे महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्या 59 व्या वाढदिवसानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर जवळील नवीन प्लॉट या ठिकाणी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे युवा जिल्हा अध्यक्ष तथा रावेर तालूका अध्यक्ष साहेबराव वानखेडे यांनी वृक्षारोपण केले.
ऐनपुर येथील प्रा.आ.केंद्र या ठिकाणी डॉ.संदीप चवरे यांना सोबत घेवून दवाखान्यात उपचार घेत असलेल्या पेशंट ला फळ वाटप केले महाराष्ट्र मध्ये ओढवलेल्या पूर परिस्थिती मुळे मुकुंद सपकाळे यांचा वाढदिवस साध्या व सोप्या पद्धतीने साजरा करण्यात आला या कार्यक्रमा वेळी युवा जिल्हा अध्यक्ष तथा तालुका अध्यक्ष साहेबराव वानखेडे डॉ. व्ही डी महाजन डॉ.संदीप चवरे डॉ.सोहेल अहमद काझी राष्ट्रवादी युवक तालुका सरचिटणीस अरविंद महाजन नितीन जयतकर राजू वानखेडे जितू इंगळे मकुंदा गणेश भुरा पाटील, गजानन कोळी सीताराम वानखेडे श्रीराम कोळी जितेंद्र सावळे एस के पाटील शेख सईद शेख शब्बीर नरेंद्र वानखेडे गौरव कोळी अजय कोळी हे उपस्थित होते



