निंभोरा वार्ताहर (प्रमोद कोंडे) निंभोरा बु. ता.रावेर येथे कृषी विद्यालयात लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती, व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी शासनाचे कोरोना प्रतिबंध नियम पाळून आयोजक ज्ञानेश्वर उमक व नवाज पिंजारी यांनी नियोजन केल्या प्रमाणे साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षपदी रावेर पं. स. सभापती कविताताई हरलाल कोळी ह्या होत्या तर दीपप्रज्वलन पं .स. सदस्य तथा रा. काँ .पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रतिमेचे पूजन ही करण्यात आले.
[ads id='ads1]
या कार्यक्रमाला पं .स.च्या उप सभापती धनश्री सावळे सरपंच सचिन महाले जेष्ठ नेते प्रल्हाद बोंडे सचिन पाटील रावेर ता.राष्ट्रवादी काँग्रेस, निंभोरा ग्रा.पं .सदस्य मनोहर तायडे ,सतिष पाटील, स्वप्नील गिरडे, शेख दिलशाद, अकिल खाटीक, मधुकर बिऱ्हाडे, सामाजिक कार्यकर्ते हरलाल कोळी ,संदीप सावळे,जेष्ठ पत्रकार राजीव बोरसे मोहन बोंडे सागर तायडे वाय.डी. पाटील, प्रशिक तायडे, अजय मोरे, भुषण बोरनारे,विष्णु उबाळे बबन उमक समाधान दांडगे भारत उमक यांसह सर्व मातंग समाज बांधव व भगिनी उपस्थित होत्या.
तसेच या कार्यक्रमात ग्रा.पं. सदस्य मनोहर तायडे यांनी प्रस्तावना तसेच आपले मनोगत व्यक्त करताना आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित समाज बांधवांना प्रबोधन देखील केले तसेच पं.स.सभापती कविताताई कोळी ,पं.स. सदस्य दिपक पाटील, प्रल्हाद बोंडे, गुलाब मंसुरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले व जेष्ठ पत्रकार राजीवजी बोरसे यांनी सुत्र संचालन तर दस्तगिर खाटीक यांनी आभार मानले.