रावेर वार्ताहर (प्रमोद कोंडे) भारतात अगोदरच कोरोनामुळे आणि लॉकडाऊन मुळे अडचणीत सापडलेले नागरिक आता विमा कंपन्यामुळे सुद्धा अडचणीत येण्यास सुरुवात झाली आहे.आजारपणात , अडी - अडचणीच्या काळात उपयोगी पडावी म्हणून आजकाल सर्वसामान्य नागरिक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढण्याकडे वळले आहेत. घरातील कर्ता व्यक्ती अंथरुणावर खिळल्यावर दुसऱ्याकडे हात पसरविण्यापेक्षा विमा कंपनी आपल्याला मदत करेल ही अपेक्षा या कोरोना कालखंडात फोल ठरली आहे.
[ads id='ads1]
सावदा येथील उपशिक्षक सचिन सकळकळे यांनी स्टार कंपनी ची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढली. एप्रिल मध्ये दुसऱ्या लाटेत कोविड सदृष्य लक्षणामुळे भुसावळ येथील साईपुष्प कोविड सेंटर मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती खालावत चाललेली बघून तातडीने यशस्वी उपचार देखील केलेत. डिस्चार्ज मिळाल्यावर जेव्हा सकळकळे यांनी स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी कडे 1 लाख 21 हजार 778 रू. चे बिल मिळावे म्हणून सर्व ओरिजिनल हॉस्पिटल, मेडिकल बिलांसह अर्ज दाखल केला परंतु कंपनी कडून त्यांना फक्त सुरुवातीला 9331 रुपये आणि ग्रिवियन्स कडे तक्रार दाखल केल्यानंतर 10669 रुपये असे फक्त 20 हजार रुपये मंजूर केले.
आणि इतर क्लेम तुम्ही कोविड सेंटर ला का गेलात? तुमची प्रकृती इतकी गंभीर नव्हती, तुम्हाला 24 तासापेक्षा जास्त हॉस्पिटलायझेशनची गरज नव्हती असे कारण देऊन उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू केली आणि क्लेम नामंजूर करून तुम्हास जिथे तक्रार करायची असेल तिथे करा अशी उद्धट भाषा वापरली गेली. त्यानुसार सचिन सकळकळे यांनी आयआरडीए कडे तक्रार दाखल केली होती परंतु तिथे त्यांच्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे बिमा लोकपाल, पुणे यांच्या कडे न्याय मिळविण्यासाठी अर्ज केला आहे. आता किमान बिमा लोकपाल कडे तरी न्याय मिळतो का याची प्रतीक्षा आहे.