पाल चे छोटूलाल चव्हाण यांना समाज सेवक पुरस्कार प्रदान..

अनामित
(महिला व बालविकास मंत्री यशोमति ठाकुर यांच्या हस्ते ; महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उपक्रम)
पाल ता रावेर :-आदिवासी परिसरातील सातपुडयाच्या पायथ्याशी वसलेले पाल येथील छोटूलाल चव्हाण यांना दी ७ ऑगस्ट रोजी खिरोदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने राज्याच्या महिला व बालविकास मंत्री मा यशोमति ठाकुर यांच्या हस्ते समाज सेवक (जीवन गौरव) पुरस्कार प्रदान करण्यात आले.या वेळी रावेर आमदार मा शिरीषदादा चौधरी , माजी खासदार डॉ. उल्हास पाटिल , कोंग्रेस जिल्हाध्यक्ष संदीप पाटील सह मान्यवर उपस्थित होते.
[ads id='ads1]
 लहापणापासुन सामाजिक कार्यात आवड असलेल्या आदिवासी क्षेत्रातील छोटूलाल चव्हाण यांनी परिस्थितिला मात करीत शिक्षणासह सास्कृतिक व आध्यात्मिक क्षेत्रात आपली महावितरणातील सेवा व्यतिरिक्त जे वेळ मिळाले त्यामध्ये सामाजिक व विविध कार्यात निस्वार्थ सेवा देऊन त्याआधि पत्रकारीते मध्ये सुद्धा आपल्या लेखनीतुन निर्भिड पणे कार्य करीत सातपुडयाच्या पाल परिसरातून अतुलनीय कार्य करणारे छोटूलाल चव्हाण यांना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमति ठाकुर यांच्या शुभ हस्ते "समाज सेवक"(जीवन गौरव)पुरस्कार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रदान करण्यात आले असून परिसरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!