पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात उत्तम संघटन बांधणी - डॉ. गोर्‍हे

अनामित
उपसभापतींच्या उपस्थितीत जळगावात शिवसेनेची आढावा बैठक उत्साहात;
जळगाव वार्ताहर (प्रमोद कोंडे )पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पक्षाच्या संघटनेत विविध पदांवर काम केले असून आता तेच स्वत: मंत्री असल्याचा लाभ शिवसेनेला जळगाव जिल्ह्यात झालेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात संघटनेची उत्तम बांधणी असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपाध्यक्षा डॉ. निलम गोर्‍हे यांनी केले. जिल्हा दौर्‍यावर आल्या असतांना त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
[ads id='ads1]
विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा डॉ. निलम गोर्‍हे जिल्हा दौर्‍यावर आल्या असतांना त्यांनी जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली. यानंतर शिवसंपर्क अभियानाच्या अंतर्गत बैठक झाल्यानंतर त्यांनी स्थानिक प्रसारमाध्यांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, जळगाव जिल्ह्यात प्रशासनाच्या प्रयत्नांनी कोरोनाचा प्रतिकार चांगला करण्यात आला असून आता कोरोनामुक्त गावे, शहरे आणि तालुका याकडे येथील वाटचाल सुरू आहे. केंद्र सरकारने लसीकरणाच्या बाबतीत गोंधळाचे वातावरण केले. त्यांनी राज्यांसोबत व्यवस्थीत समन्वय ठेवला नाही. तसेच लसींचा आवश्यक असणारा पुरवठा झाली नाही. जर व्यवस्थीत पुरवठा झाला असता तर फेब्रुवारी अखेर पर्यंत लसीकरण पूर्ण होऊन दुसर्‍या लाटेत बळी गेले नसते.

डॉ. निलम गोर्‍हे म्हणाल्या की, कोरोनाच्या आपत्तीमध्ये राज्य सरकारने समाजातील उपेक्षित घटकांना मदतीसाठी आठ विविध योजना अंमलात आणल्या असून याचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला. यात स्थानिक प्रशासनाने केलेल्या कामगिरीचा माहिती जाणून घेतली. जळगाव जिल्ह्याने कोरोनेचा यशस्वी प्रतिकार तर केलाच आहे, पण विविध योजना यात प्रामुख्याने पाणंद / शिवरस्ते आणि पालकमंत्री संरक्षण भिंत योजनांची यशस्वी अंमलबजावणी झाल्याचे डॉ. गोर्‍हे म्हणाल्या.

 तसेच शिवसेनेतर्फे नुकत्याच राबविण्यात आलेल्या शिवसंपर्क अभियानाच्या अंतर्गत करण्यात आलेली नोंदणी आणि उपक्रम याची माहिती सुध्दा या दौर्‍यात आपण जाणून घेतली. जळगाव जिल्ह्यात शिवसेना मजबूत अवस्थेत आहे. जिल्ह्याचे नेतृत्व करणारे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे स्वत: संघटनेतून आले आहेत. शाखाप्रमुखा पासून ते मंत्रीपद आणि उपनेत्यापर्यंतचा अनुभव त्यांच्या गाठीशी असल्याने याचा साहजीकच जिल्हा शिवसेनेला लाभ झाल्याचे दिसून येत आहे.

यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांता डॉ. निलम गोर्‍हे यांनी उत्तर दिले. आज राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्या झालेल्या भेटीवर अशा भेटीगाठी होत असल्याने याबाबत आजच अर्थ काढता येणार नसल्याचे त्या म्हणाल्या. तर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचेही त्यांनी नमूद केले. जळगाव महापालिकेत अलीकडेच शिवसेनेत आलेले नगरसेवक फुटण्याच्या तयारीत असल्याच्या वृत्ताचा इन्कार करत त्यांनी असे काहीही नसून आमचा एकही नगरसेवक दुसरीकडे जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तर, जिल्हा शिवसेनेत कोणत्याही कोणत्याही प्रकारचे वाद नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, संपर्क प्रमुख संजय सावंत, सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ ,जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. हर्षल माने, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, महानगराध्यक्ष शरद तायडे, बाजार समिती सभापती कैलास चौधरी, जिल्ह्यातील उपजिल्हा प्रमुख , तालुका प्रमुख, पं.स. सभापती , जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह लोकप्रतिनिधी व पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!