रावेर - श्रावण महिन्यात पावसाची झडी, रिमझिम गेल्या दोन तीन दिवसापासुन सुरु असुन त्यामुळे आदिवासी भाग असलेल्या लालमाती - पाल या गावाजवळील घाटात, रस्त्यात गावाच्या चारी दिशांच्या रस्त्यांची दैनिय अवस्था झाली आहे.तर अपघात ही होत आहेत.
[ads id='ads1]
तर या महिन्यातील काही दिवसांपूर्वी लालमाती गावाजवळ पालकडुन येत असतांना पुनखेडा येथील एका ट्रॅक्टरचा अपघात घडला त्याचे कारण खड्डा, खड्ड्यात ट्रॅक्टर गेल्याने ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटला आणी तेच ट्रॅक्टर चालकाच्या छाती वरुन गेले त्या वेळेस लालमाती सहस्त्रलिंग येथील नागरीकांनी धावपळ केली.
घटना स्थळी दाखल झाले त्यानंतर 108 वर कॉल केला असता रावेर ग्रामिण रुग्णालय येथील रुग्णवाहिका तात्काळ बोलवण्यात आली मात्र ती तात्काळ येवु शकली नाही. खाजगी वाहनांच्या साहाय्याने रुग्णवाहिका पर्यंत पोहचाव लागल रुग्णावाहीका चालकास तीन वेळा 108 द्वारे कॉल कनेक्ट केला असा रुग्णवाहिका चालका ने दिलेले उत्तर
" भाऊ रस्त्यांत खड्डे पडले आहे
त्यामुळे वेळ लागतोय मुंजलवाडी च्या पुढे आहे दादा येताच"
मात्र अपघातग्रस्ताची अवस्था बघता नागरिकांचा जीव कासावीस होऊ लागला त्याला खाजगी गाडीने रुग्णवाहिका पर्यंत पोहचवण्याचे वेळ या खड्यामुळे नागरीकांना आली हा प्रकार काही बनावट काहाणी नाही तर सत्य घटना आहे.
बहुतेक गाड्या अवजड वाहने वाहतुक पाल ते लालमाती कुुसुंबा मार्गे रोज रावेर कडे मार्गक्रमण सुरु आहे. वाहन चालवणा-याला तर या रस्त्यावरुन वाट शोधणे ही अवघड झाले आहे. खड्डयांमध्ये पावसाचे पाणी साचुन त्यांचे भल्या मोठ्या डबक्यात रुपांतर झाले आहे.
खड्डे आणि डबक्यांमध्ये हा रस्ता बुडाल्याने रस्त्यावरुन वाहतूक चालवणेही कठीण झाले आहे. संबधित विभागाचे ही या कडे दुर्लक्ष आहे.
रावेर तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रात रस्त्यांची अवस्था बघता कुठे नेवुन ठेवला तालुक्याचा विकास असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो बरेच वृत्त दिले मात्र लोकप्रतिनिधी, संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष कायम ठाम?...
तर आता एक नवी कृत्य समोर आले वाचुन आचार्य होईल तर फोटोत पण तेवढेच दिसेल वाचा सविस्तर कुसुंबा मार्गे लालमाती जात असतांना एक वळणाचा रस्ता आहे त्यात भल्येमोठे खड्डे पडले आहे
मात्र या फोटोत दाखवल्याप्रमाणे लालमाती रावेर कुसुंबा गावाकडे मार्गक्रमण करण्यार्या लालमाती च्याघाटात खड्याचे रुपांतर पाणी साचलेले टबक्यात होतांना दिसायला मिळेल वाहने चालवण्यास प्रवाश्यांना अतिशय त्रास होत आहे मग आता खड्डा तर पडला मात्र लोकप्रतिनिधी, संबंधित प्रशासन करतय काय ?
