...याप्रकरणी केलेल्या कारवाईत बारचालक, मॅनेजर, वेटर महिला व ग्राहक अशे 56 जण ताब्यात...

अनामित
कल्याण -  मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मोनालिसा रेस्टॉरंट आणि बारमध्ये कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी टाकलेल्या धाडीत त्याठिकाणी महिला वेटर विनामास्क होत्या तसेच तोकड्या कपड्यात ग्राहकांशी अश्लील कृती व हावभाव करताना आढळून आले. [ads id='ads1]

संबंधित प्रकरणी केलेल्या कारवाईत 21 महिला वेटर, 30 ग्राहक, बारचालक आणि अन्य वेटर अशा 5 ज अशा 56 जणांना ताब्यात घेऊन त्यांना स्थानिक मानपाडा पोलिसांच्या हवाली केले. हा बार कल्याण पुर्वेकडील हाजीमलंग रोडवर आहे. या ठिकाणी कोरोनाचे नियमांचे उल्लंघन करून गाण्यांवर चाललेल्या महिलांच्या अश्लील हावभाव आणि कृत्याकडे स्थानिक मानपाडा पोलिसांचा कानाडोळा झाला असताना

 कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक विलास पाटील याच्या माहिती नुसार संबंधित बारच्या मालक आणि चालकांकडे परवाना नसतानाही त्याठिकाणी ग्राहकांना लेडीज सर्व्हिस देवून ग्राहकांना आकर्षित करणेकरीता महिलांना तोकडे कपडे परिधान करण्यास लावून हावभाव करून अश्लीक कृत्य करीत आहेत.  मिळालेल्या माहीतीनुसार पाटील यांच्या पथकाने संबंधित बारवर छापा टाकला असता 

बारमधील 56 जणांना ताब्यात घेऊन.यात 21 महिला वेटर 30,ग्राहक,बारचालक आणि अन्य वेटर अशा 5 जणांचा समावेश आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी 63 हजार 410 रूपयांची रोकड आणि 14 हजार 500 रूपयांचे गाणी वाजविण्याचे साहीत्य असा 77 हजार 910 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!