यावल येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महामार्गावरील खड्ड्यांचे श्राद्ध आंदोलन...

अनामित
यावल - येथ महामार्गवरील रस्त्याची खुप दैनिय आवस्था झाली आहे तर या रस्त्याचे जीवघेणे खड्डे बुजविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावल ब-हाणपुर अंकलेश्वर महामार्गत पडलेल्या खड्ड्याचे श्राध्द घालून आंदोलन करण्यात आले आंदोलन हे जळगाव जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांच्या नेतृत्वाखाली खड्यांचे श्राद्ध आंदोलन करण्यात आले. [ads id='ads1]

नेहमी वर्दळीचा असेलला महामार्ग खड्डेमय झाला आहे. या खाड्यांमध्ये पाणी साचत असून यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

दुर्दैवाने एखाद्याचा यात नाहक बळी जात असेल तर या खड्यांचा व सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. 

यात महामार्गावरील खड्ड्यांची पूजा करून त्याचे श्राद्ध घालण्यात आले. यावेळी तात्काळ हे खड्डे बुजविण्यात न आल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांनी दिला.

 याप्रसंगी तालुका उपाध्यक्ष शाम पवार, शहराध्यक्ष किशोर नन्नवरे, विद्यार्थी सेना गौरव कोळी, विभागाध्यक्ष आबिद कच्छी, गणेश माळी, विपुल येवले, प्रतिक येवले, राज शिर्के, कुणाल बारी, आकाश चोपडे, कमलेश शिर्के इ. सहभागी झाले होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!