तीच चारचाकी चक्क १५० फुट दरीत कोसळली !
खेड - नाशिक ते पुणे महामार्गावरील खेड घाटात एक चारचाकी गाडीत बिघाड झाल्याने चालकाचा ताबा सुटला होता मात्र तीच चारचाकी चक्क १५० फुट दरीत कोसळली आणि सुदैवाने खेडपोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेत चालकाचे प्राण बचावले आहे. चालक संजय मधुकर खैरनार (वय 49 रा.नाशिकरोड नाशिक) येथील राहणारे होते. [ads id='ads1]
तर ही घटना 13 तारखेच्या रात्री महामार्गावरुन प्रवास करत असताना दिनांक 14 च्या रात्री वेळ 12 : 30 वाजता ही घटना घडली खैरनार हे नाशिकवरून पुण्याला नातेवाईका कडे जात होते. पुणे - नाशिक महामार्गावर नवीन बाह्यवळण खेड घाटात आल्यानंतर अचानक चारचाकी कारचा बिघाड झाला. घाटात गाडी थांबवून खैरनार यांनी गाडीची पाहणी केली. पुन्हा गाडी सुरू केली असता अचानक गाडीचा वेग वाढला व आणि गाडी थेट १५० फुट दरीत गेली. दरम्यान एका व्यक्तीने खेड पोलिसांना या घटनेची माहिती दिल्याने. पोलीस (अं) स्वप्नील गाढवे आणि त्यांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी दरीत उतरुन चारचाकी गाडीच्या काचा फोडून जखमी अवस्थेत असणाऱ्या खैरनार यांना बाहेर काढले. खेड घाटातील बाह्यवळण रस्त्यावर अनेक ठिकाणी सरंक्षक कठडे नसल्याने खैरनार याची गाडी दरीत कोसळली झाडे झुडपांत गाडी अडकल्याने व पोलीस तात्काळ घटनास्थळी धावून गेल्यामुळे चालक खैरनार यांचा जीव वाचला आहे.