कोचुर (ता.रावेर प्रतिनिधी) : रावेर तालुक्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसामुळे कोचुर येथील एक व्यक्ती शेता मध्ये शेती काम करत असतांना त्यांच्या अंगावर विज कोसळल्याने रावेर तालुक्यातील कोचुर येथील एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपार च्या दरम्यान घडली आहे.[ads id="ads1"]
रावेर तालुक्यात जोरदार व मूसळधार पाऊस झाला असल्याने यामुळे रावेर तालुक्यातील अनेक नद्या या दुथडी भरून वाहत आहे. [ads id="ads2"]
रावेर तालुक्यातील कोचुर येथील नामे अजित भिलासींग परदेशी रा.कोचुर ता.रावेर जि.जळगाव हे शेता मध्ये काम करत असताना त्यांच्या अंगावर वीज पडली. त्यांना उपचारासाठी तात्काळ सावदा येथील Dr. सुनील चौधरी यांच्या हॉस्पिटल मध्ये त्यांचे वर उपचार सुरू आहे. त्यांची तब्येत धोक्याबाहेर आहे. अशी माहिती समोर येत आहे.