Gujarat CM Resigns: गुजरातच्या राजकारणात मोठा भूकंप; मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


गांधीनगर (वृत्तसंस्था: गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण समजू शकले नाही.

मात्र, रुपाणी यांच्या राजीनाम्याने गुजरातच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. (Gujarat chief minister vijay rupani resigns) [ads id="ads1"]

मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी थोड्या वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन आपण पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे त्यांनी संधी दिल्याबद्दल आभार मानले.

रुपाणींविषयी थोडक्यात

गुजरातमध्ये पुढील वर्षी डिसेंबर 2022 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. मात्र त्याआधीच . मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या राजीनाम्याने गुजरातच्या राजकारणात खळबळ उडाली. विजय रूपाणी हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते गुजरात विधानसभेत पश्चिम राजकोटचे प्रतिनिधित्व करतात 7 ऑगस्ट 2016 रोजी त्यांनी गुजरातचे 16 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते गुजरात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षही आहेत.

विजय रुपाणींचा जन्म 2 ऑगस्ट 1956 रोजी रंगून, बर्मा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रमणिकलाल आणि आईचे नाव मायाबेन. ते जैन धर्माचे अनुयायी होते. रमणिकलाल कुटुंब 1960 मध्ये बर्मा सोडून भारतात आले. मग ते राजकोट, गुजरात येथे राहू लागले. विजय रुपाणींनी धर्मेंद्रसिंह महाविद्यालयातून पदवी घेतली आणि नंतर सौराष्ट्र विद्यापीठातून एलएलबी केले.

[ads id="ads2"]

कोण आहेत विजय रुपाणी?

>> गुजरात रुपाणी यांनी गुजरताचं मुख्यमंत्रिपद भूषवलं, ते सध्या 65 वर्षांचे आहेत


>> 7 ऑगस्ट 2016 रोजी त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती


>> ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळचे मानले जातात


>> भाजपा आणि संघ यांच्यातील दुवा म्हणून ते परिचीत होते.


>> आनंदीबेन पटेल यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी वाहतूक, पाणीपुरवठा, कामगार तसेच रोजगार अशी मंत्रिपदं भूषवली


>> गुजरातमध्ये अनेक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम त्यांनी पाहिलं.


>> रुपाणी हे 1996 मध्ये राजकोटचे महापौर होते


>> त्यांनी 2006 ते 2012 या काळात राज्यसभा खासदार म्हणूनही काम पाहिलं


>> नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा रुपाणी हे राज्य वित्त मंडळाचे अध्यक्ष होते

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!