या शहरात लॉजवर अनैतिक धंदे पाच महिलांची सुटका..

अनामित
उल्हासनगर - Camp No-4 मोर्यानगरी आशेळेगाव मुख्य रस्त्या जवळील रहिवासी क्षेत्रात असलेल्या पुनम लॉजिंग ॲन्ड बोर्डिंग या लॉज मध्ये महिलांकडून अनैतिक धंदा करून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळावी होती.अनैतिक धंदा करणाऱ्या पाच महिलांची सुटका केली असुन संबंधित प्रकरणी लॉज चालकाविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. [ads id='ads1]

सविस्तर वृत्त असे की संबंधित लॉज मध्ये महिलांकडून अनैतिक धंदा करून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.माहितीनुसार सहाय्यक पोलीस आयुक्त डी डी टेळे व विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैय्या थोरात यांच्या आदेशानुसार पोलिसांनी गुरवारी पूनम लॉजवर धाड टाकली असता

तेथे पाच महिलांन कडून अनैतिक धंदा करून घेतले जात असल्याची माहिती उघड झाली. पोलिसांनी त्यांची सुटका करून लॉज चालक जीवन शेट्टी ( वय ४२ ) याला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती सूत्रांनी मिळाली संबंधित प्रकारचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

मात्र या निमित्ताने शहरातील बहुतांश लॉजिग & बोर्डिंगवर अनैतिक धंदा चालत असल्याची चर्चा या प्रकाराने होत आहे. अश्या लॉजिंगवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!