मुंबई : महाराष्ट्र राज्यात गेल्या बर्याच दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असताना पश्चिम उपनगरात साकीनाका परिसरात घडलेल्या धक्कादायक अशा घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेले आहे. सविस्तर माहिती अशी की एका विकृत परप्रांतीयाने ३२ वर्षाच्या महिलेवर पाशवी बलात्कार करीत निर्दयपणे गुप्तांगावर मारहाण करून तिचा खुन केला.
[ads id='ads1]
गंभीर जखमा झाल्याने झालेल्या अबलेची मृत्यूशी सुरू असलेली झुंज तब्बल सुमारे ३३ तासांनंतर अपयशी ठरली. राजावाडी रुग्णालयात उपचार अपयशी ताना शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. माणुसकीला काळिमा फासणारे हे दुष्कृत्य करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. मोहन चौहान, असे या क्रूरकर्म्याचे नाव असून, तो मूळचा उत्तर प्रदेशातील जौनपूरचा आहे. त्याला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. साकीनाका खैरानी रोडवरील चांदिवली स्टुडिओच्या रशीद कम्पाउंडजवळ एक जण टेम्पोमध्ये महिलेला मारहाण करीत असल्याचे या परिसरातील पुठ्ठ्याच्या कारखान्यातील कंपनीत काम करणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाने वार शुक्रवारी वेळ मध्यरात्री ०३.२० वाजता पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले.
त्यानंतर साकीनाका पोलीस ठाण्याचे रात्रपाळीचे निरीक्षक ढुमे व पथक १० मिनिटांत तेथे पोहोचले. एक महिला टेम्पोमध्ये रक्तबंबाळ अवस्थेत आढळली. त्यांनी तिला त्याच टेम्पोतून तातडीने राजावाडी रुग्णालयात नेले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने ती बेशुद्धावस्थेत होती. अतिदक्षता विभागात दाखल करून उपचार सुरू केले.
मात्र, खूप खोलवर जखमा झाल्या असल्याने शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. दरम्यानच्या काळात पोलिसांनी विविध पथके नेमून हल्लेखोराचा शोध सुरू केला. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर पथकांनी अनेक ठिकाणी त्याचा शोध घेतला. तो अन्य जिल्ह्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला शिताफीने पकडण्यात आले.
पीडित महिलेला दोन मुली असून, या मुलींच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी राज्य सरकार आणि शिवसेना घेणार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे स्पष्ट केले.
प्रकरणाचा तपास एका महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले. टेम्पो चालक म्हणून काम करणाऱ्या मोहन चौहानला दारूचे व्यसन असून त्याने एकट्याने हे कृत्य केल्याचे आतापर्यंतच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. त्याचा भाऊ व बहिणीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत असल्याचेही नगराळे म्हणाले. तर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून एक महिन्यात दोषारोप पत्र दाखल केले जाईल असे उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री यांनी म्हटले

