Exam Breaking : आरोग्य विभागाची स्थगित झालेली परीक्षा "या" तारखेला होणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

अनामित


मुंबई - आरोग्य विभागामार्फत घेतली जाणार्या गट क आणि गट ड पदाची परीक्षा 25 आणि 26 सप्टेंबर रोजी होणार होती. मात्र ही परीक्षा रद्द झाली आल्याची घोषणा आदल्या दिवशी करण्यात आली होती. ही घोषणा होण्यापूर्वीच अनेक विद्यार्थी परिक्षा देण्यासाठी घरातून बाहेर पडले होतेे .[ads id='ads1]
  तर काही विद्यार्थी पोहोचले सुध्दा होते तर काहीजण प्रवासात होते ऐनवेळी परीक्षा रद्द करण्याची घोषणा झाल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. अनेकांच्या वेळेचं आणि पैशांचंही नुकसान झालं. त्याबाबत दिलगिरी व्यक्त करत आज नवी तारीख जाहीर झाली आहे [ads id='ads2] 
   आज दुपारी परीक्षा घेण्याबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर परीक्षांची तारीख ठरवण्यात आली आहे. 

आरोग्यमंत्री ना, राजेश टोपे म्हणाले ? 

रविवार असल्यामुळे शाळा या बंद असणार आहे. त्यामुळे सर्व शाळा या उपलब्ध असणार आहे. सर्व शाळा आणि सेंटरची यादी तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दोन दिवसांआधी हॉल तिकीटं दिली जाणार आहे. 

तसंच परिक्षा देणार्या उमेदवार यांनी "कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका" काही लोक चुकीची काम करण्याचा प्रयत्न करता काही लोक वावड्या उठवत असतात"  त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा अफवांना बळी पडू नये,  जर कुणी असं करताना आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही टोपे यांनी दिला.

या तारखेला होणार परीक्षा 

आरोग्य विभागाच्या गट क ची परीक्षा 24 ऑक्टोबरला तर गट ड ची परीक्षा 31 ऑक्टोबरला होणार आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!