तांदलवाडीसाठी मुळ आस्थापनेवर पुर्ण वेळ ग्रामविकास अधिकारी आणि तलाठी मिळावे - सरपंचासह, ग्रामस्थांची मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे) Raver तालुक्यातील तांदलवाडी येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात गेली तीन महिने झाले प्रभारी ग्रामविकास अधिकारी आहे. यांचे कडे उदळी बु Udali Bk आणि तांदलवाडी Tandalwadi अश्या दोन मोठया ग्रामपंचायती आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी आठवड्यातून तीन दिवस आलटून पालटून ते उपस्थित राहतात त्यांना दोन्ही ग्रामपंचायती मध्ये तारेवरची कसरतच करावी लागत आहे. [ads id="ads1"] 

  त्यात वेळोवेळी तालुक्यावर मिटिंगांना जावे लागले.त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कार्यकामात सातत्य राखले जात नाही.याचा परिणाम पंचायतीच्या वसुलीवर आणि विविध विकास कामांवर होत असून लोकांची कामे वेळेवर होत नसल्याने त्यांची नाराजी होत असते. तसेच तलाठी पण प्रभारी आहे. [ads id="ads2"] 

  शेतकऱ्यांची कामे वेळेवर होत नसल्याने ते देखील नाराजी व्यक्त करत असतात मागील महिन्यात सरपंच  सुरेखा सिद्धार्थ तायडे यांनी Raver गटविकास अधिकारी Raver BDO  दिपाली कोतवाल यांचे कडे पूर्ण वेळ ग्रामविकास अधिकारी मिळावा या साठी एक निवेदन दिले होते त्याचे काहीही आज पर्यात उत्तर मिळाले नाही.      तसेच Raver तहसीलदार उषाराणी देवगुने यांनी देखील पुर्ण वेळ तलाठी यांची व्यवस्था करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!