जामनेर शहरात दिव्यांग बांधवांना बनावट ओळखपत्र देणारी टोळी जेरबंद

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


मुद्देमालासह दोघांना घेतले ताब्यात ;गुन्हा दाखल . जामनेर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या पथकाची कामगिरी

जामनेर( सुवर्ण दिप वृत्तसेवा ) दिव्यांग बांधवांना बनावट ओळखपत्र देऊन शासनाची लूट करणाऱ्या टोळीचा जामनेर पोलिसांनी पर्दाफाश केल्याची घटना नुकतीच घडली असून आरोपींविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .[ads id="ads1"]  

याबाबत अधिक माहिती अशी की , शासनामार्फत दिव्यांग बांधवांना एसटी बस प्रवासासाठी वनफोर तिकीट तसेच इतर सुविधांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक असणारे दिव्यांग ओळखपत्र दिले जाते .दिव्यांग बांधवांना ओळखपत्र देण्यासाठी शासकीय प्रक्रियेतून जावे लागते . मात्र जामनेर शहरातील एका टोळीने दिव्यांग बांधवांचे बनावट ओळखपत्र तयार करून शासनाची तसेच दिव्यांग बांधवांची ही फसवणूक केली असल्याची तक्रार जामनेर पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्या नुसार तसेच निर्भीड पत्रकार संघाचे पदाधिकारी यांच्या सतर्कतेमुळे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी सापळा रचून संबंधित आरोपींना ताब्यात घेतले .[ads id="ads2"]  

या प्रकरणातील ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे शेख अब्दुल्ला शेख अमीन ( रा .घरकुल जामनेर ) आणि गोपाल विनायक सोनार (राहणार जामनेर पुरा ) अशी असून त्यांना सापळा रचून जामनेर नगर परिषदे जवळ मुद्देमालासह पकडण्यात आले आहे .

याप्रकरणी अजून काही मासे गळाला लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे . या टोळीत आणखीन मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचीही शक्यता आहे .शासनाची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात सदर आरोपींनी कमाई केली असल्याचे प्रथम दर्शनी स्पष्ट झाले आहे . पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पाटील , योगेश महाजन , सुनील माळी रियाज शेख ,दिलीप वाघमोडेयांच्या पथकाने सदर कारवाई केली . या प्रकरणी जामनेर शहरातील निर्भीड पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा सदर टोळीचा  पर्दापाश करण्यासाठी महत्वाची भुमीका बजावली आहे .

जामनेर शहरात बनावट ओळखपत्र आणि शासकीय कागदपत्रे देणारी टोळी जेरबंद झाली असल्याने नागरिकांनी पोलीस पथकाचे कौतुक केले .

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!