रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे) निळे निशाण सामाजिक संघटनेच्या रावेर येथिल मुख्य कार्यलयात दि .२५/०९/२०२१ रोजी फैजपूर विभागाचे सेवानिवृत्त डी . वाय. एस .पी.नरेंद्रजी पिंगळे साहेब यांनी संघटनेत सामील होऊन संघटनेच्या नियोजन समिती प्रमुख तसेच उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते पदाची जबाबदारी स्विकारली . [ads id='ads1]
त्या प्रसंगी संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला व उपस्थित जळगांव जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष महेशजी तायडे , उपाध्यक्ष सदाशिव निकम , रावेर तालुका अध्यक्ष चंद्रकांत गाढे , उपाध्यक्ष सुधिर सैंगमिरे , नारायण सवर्णे युवक उपाध्यक्ष सतिश निकम , शरद वानखेडे , धीरज तायडे , प्रविण वाघ , अरविंद भालेराव , विशाल भालेराव व इतर कार्यकर्त्यांनी सन्माननिय पिंगळे साहेबांना शुभेच्छा दिल्या .