रावेर - महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाची परीक्षा मविआ सरकारने एक दिवस आधी रद्द करून दुरुदुरून पैसे खर्च करून परीक्षेसाठी पोहचलेल्या विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या मविआ सरकारचा भारतीय जनता युवा मोर्चा, जळगांव तर्फे खा, रखशाताई खडसे रावेर व भाजयुमो जळगाव जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन यांच्या नेतृत्वात रावेर येथे तहसिलदार यांना निवेदन देऊन जाहीर निषेध करण्यात आला.[ads id="ads1"]
कोविड मुळे अनेक वेळा परीक्षा रद्द करण्यात आल्या परंतु फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी परीक्षा रद्द होणार नाही, कोणीही अफवांना बळी पडू नका असे सांगितले होते.
परंतु दुरुदुरून पैसे खर्च करून परीक्षेसाठी विद्यार्थी परीक्षा केंद्रा ठिकाणी पोहचल्या नंतर, ऐनवेळेवर आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करून मविआ सरकारकडून विद्यार्थ्यांची फसवणुक करण्यात आली. यासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक भरपाई मिळावी तसेच पुढील दोन दिवसात परीक्षेची नवीन तारीख निश्चित करून प्रसिद्ध करावी व या सर्व गलथान कारभारासाठी जबाबदार असणारे आरोग्य मंत्री यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी भाजयुमो यांच्या कडून करण्यात आली. तसेच सदर मागण्या मान्य न केल्यास भाजयुमो कडून तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा मविआ सरकारला इशारा देण्यात आला.[ads id="ads2"]
यावेळी खा, रक्षाताई खडसे भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, जि.प.अध्यक्षा सौ.रंजनाताई पाटील, भाजपा किसान मोर्चा उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख श्री.सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्ष श्री.नंदकिशोर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष श्री.पद्माकर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष श्री.प्रल्हाद पाटील, तालुकाध्यक्ष श्री.राजन लासूरकर, अ.जा.मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.विकास अवसरमल, प.स.सभापती सौ.कविताताई कोळी, प.स.उपसभापती सौ.धनश्रीताई सावळे, श्री.शिवाजीराव पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, आघाडी तालुकाध्यक्ष रेखाताई बोंडे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल महाजन, कु.उ.बा.समिती सभपती गोपाल नेमाडे, जि.प.सदस्य कैलास सरोदे, माजी सभापती जितेंद्र पाटील, श्री.पी.के.महाजन, श्री.जुम्मा तडवी, सौ.योगिता वानखेडे, बेटी बचाव बेटी पढाव जिल्हा संयोजिका सौ.सारिका चव्हाण, सरचिटणीस महेश चौधरी, श्री.सुनिल पाटील, श्री.हरलाल कोळी, श्री.सी.एस.पाटील, श्री.पराग पाटील, श्री,राहुल महाजन, श्री.महेश पाटील, श्री.संदीप सावळे, श्री.नितीन माधवराव पाटील, सुनील लक्ष्मण पाटील, महेश नारायण पाटील, राहुल काशिनाथ पाटील, संजय काशिनाथ महाजन, बाळू बाबुराव काकडे, गोकुळ रामदास महाजन, स्वप्निल शांताराम पवार, शुभम एकनाथ पाटील, नत्थु धांडे, संजय माळी, राहुल पाटील, प्रमोद चौधरी, भूषण पाटील,संजय महाजन,स्वप्नील पाटील,विजय महाजन, हर्शल दिलीप पाटील, उमेश कोळी, रमाकांत बारी, गिरीश पाटील, मनोज धनगर, राजू पाटील, निवृत्ती ज्ञानेश्वर पाटील इ. कार्यकर्ते उपस्थित होते.