विवरे बु येथे ग्राम पंचायत महात्मा गांधी तंटा मुक्त गावसमितीच्या अध्यक्ष पदाला रावेर पंचायत समिती बिडीओ यांनी दिली स्थगीती
रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक सरपंचाला दणका ; तंटामुक्ती अध्यक्ष निवडीला स्थगिती
विवरे बुद्रुक (सुवर्ण दिप वृत्तसेवा) ग्रामपंचायतिची ग्रामसभा चांगलीचं गाजत आहे. गावातील ग्रामसभेची थेट पंचायत समितीत तक्रारी केल्या जात असल्याने, गावकीचा वाद चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. बुधवारी ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी पंचायत समिती समोर आमरण उपोषणांची परवानगी मागितली असता, गटविकास अधिकारी यांनी पत्र काढत चौकशी करण्याचे आदेश काढले आहे.[ads id=ads1]
यात पंचायत राज दौऱ्यापर्यंत तंटामुक्ती निवड स्थगितीचे नमूद आहे. दि. ३० ऑगस्ट रोजी झालेली ग्रामसभेत तंटामुक्ती समिती अध्यक्ष • निवडीवरून वाद आणि चढाओढ झाल्याने, सभा बारगळली होती, याबाबत निर्णय न झाल्याने पुढील सभेची अपेक्षा असतांना, सरपंच व काही पदाधिकारी यांनी निवड प्रतिष्ठेची ठरवत यात इस्माईल खा यांची बेकायदेशीर निवड घोषित केला असल्याची तक्रार ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी पंचायत समिती गाठत गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती. [ads id=ads2]
बुधवारी राष्ट्रवादी पार्टीचे विवरे येथील शाखा अध्यक्ष चेतन पाटील व शिवसेनेचे विभाग प्रमुख पिंटू माळी यांनी गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांना पत्र देवून आमरण उपोषण करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने गटविकास अधिकारी यांनी तंटामुक्ती अध्यक्ष निवडीला स्थगित ठेवण्याचे आदेश दिले आहे.