लग्नाचे आमिष दाखवून खाजगी दवाखान्यात प्रॅक्टिस करणाऱ्या तरुणीवर बलात्कार ; आक्षेपार्ह छायाचित्रे व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी..

अनामित

[ads id='ads1]

औरंगाबाद - पीडित तरुणीचे BDS चे शिक्षण झाले असून ती एका खाजगी दवाखान्यात प्रॅक्टिस करते असी माहिती समोर आली आहे तर वर्गमैत्रिणीने लग्नात तरुणीची तिचा नातेवाईक अजहर शेख याच्यासह त्याची आई व बहिणीची ओळख करून दिली. तेव्हा त्याने एका विमान कंपनीत मुंबई येथे नोकरीला असल्याचे सांगितले होते. 



त्याने पहिल्याच भेटीतच सांगितले की तू आवडत असून आपण लग्न करूया अशी मागणी घातली लवकरच सौदी एअरलाइन्समध्ये नोकरी लागेल असेही आरोपी ने सांगितल होत. आपण जेद्दा येथे स्थायिक होऊ, असे आमिष दाखवत यातून दोघांची मैत्री वाढु लागली यानंतर आरोपीने २१ नोव्हेंबर २०२० रोजी औरंगाबादेत एका हॉटेलवर भेटण्यास बोलावून बळजबरीने अत्याचार केला. 



त्यावेळी खोलीत तिचे अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ काढले व ते व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर त्याने दिनांक ९,१० जानेवारी, १ व २२ फेब्रुवारी २०२१ रोजी विविध ठिकाणी तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आणि त्याच कालावधीत काढलेले आक्षेपार्ह अश्लील छायाचित्रे व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या आई - वडिलांच्या मोबाईलवर तिचे छायाचित्रे व व्हिडिओ पाठवून १० लाख रुपयांची मागणी केली.



   या सर्व प्रकारामुळे घाबरलेल्या पीडितेने सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तर फिर्यादीनुसार अत्याचार करणाऱ्या आरोपी अजहर अश्फाक शेख (रा. घाटकोपर वेस्ट, मुंबई) असून त्यास ओसामा खान व हमजा पठाण यांनी मदत केल्याची सिटी चौक पोलीस ठाण्यात फिर्यादीवरून यावरून बलात्कार, खंडणीसह इतर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!