यावल प्रतिनिधी : यावल तालुक्यातील नायगाव येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी उघडकीस आली आहे. मिलींद उर्फ भिका गल्लु कोळी ( वय २८ वर्ष) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर वृत्त असे की, Yawal तालुक्यातील नायगाव येथील मिलींद कोळी हा ट्रॅक्टर चालक आहे. आज सकाळी त्याने राहत्या घरातील छताच्या साडी बांधुन गळफास घेवुन आपली जिवन यात्रा संपवली आहे.मयत भिका कोळी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. [ads id="ads2"]
या अविवाहीत तरुणाने आत्महत्या का केली हे मात्र स्पष्ठ होवु शकले नाही. चंद्रकांत सुखदेव कोळी यांच्या खबरीवरून यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे.



