रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) शहरातील सावदा रोड स्थित तडवी कॉलनी परिसरातून अज्ञात चोरट्याने मध्यरात्री घरात प्रवेश करत कपाटातील ६७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली. [ads id="ads1"]
याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्ताक रसुल तडवी (वय-५५) रा. तडवी कॉलनी रावेर हे खाजगी नोकरीला आहेत. २४ सप्टेंबर रोजी रात्री ११ ते २५ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजेच्या दरम्यान सगळेजण घरात झोपलेले असताना [ads id="ads2"] अज्ञात चोरट्याने घरात शिरून घरातील लोखंडी कपाटातील सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण ६७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी मुस्ताक रसुल तडवी यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुरेश मेढे करीत आहे.