रावेर - पंचायत समिती सदस्या योगिता रामदास वानखेडे यांनी भाजप पक्ष वाढीसाठी अनेक कार्यक्रम राबविणे कार्यक्रमास हजेरी देणे, वेळेवर हजर राहून उपस्थित राहणे इतकेच नव्हे तर गोरगरिबांना मदत करणे तसेच भाजप च्या अनेक [ads id='ads1]
रावेर तालुक्यातील मोर्चा मध्ये शामिल देखील होतात तर भाजप पक्ष वाढीसाठी त्यांनी रावेर तालुक्यातील जमेल तेवढे प्रयत्न यांनी केली तर सोशल मिडीयावर देखील त्यांची छाप कायम आहे, मात्र पक्ष त्यांची दखल घेत नसल्याचे चित्र काल स्पष्ट दिसून आले .
पंचायत समिती सदस्या योगिता वानखेडे यांच्या भावनांचा फुटला बांध
सर्वांना संधी दिली जाते मग मलाच का डावलले जाते असा प्रश्न विचारत रावेर पंचायत समिती सदस्या योगिता वानखेडे यां खासदार रक्षा खडसे व जि.प. अध्यक्षा रंजना पाटील यांच्या समोर भावनांचा बांध फुटला आणि त्या अचानकच ढसा-ढसा रडू लागल्या हा सर्व प्रकार तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाच्या उदघाटना वेळी घडला. [ads id='ads2]
पंचायत समिती सदस्या योगिता रामदास वानखेडे यांना उपसभापतीपदाची अपेक्षा होती मात्र त्यांना संधी न मिळाल्याने त्याच्या भावनांचा बांध फुटला. यावेळी उपस्थितांनी त्यांची समजूत काढल्याने त्या शांत झाल्या. मात्र राजकीय वर्तुळात हा विषय चर्चेचा बनला आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य तथा सेवा व समर्पण अभियानाचे जिल्हाप्रमुख नंदकिशोर महाजन, उत्तर महाराष्ट्र किसान सभेचे अध्यक्ष सुरेश धनके युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष श्रीकांत महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, पंचायत समिती सभापती कविता कोळी, उपसभापती धनश्री सावळे, पंचायत समिती सदस्य योगिता वानखेडे, माधुरी नेमाडे, जुम्मा तडवी, बेटी बचाव बेटी पढावच्या जिल्हाध्यक्षा सारिका चव्हाण, सरचिटणीस महेश चौधरी, माजी उपसभापती सुनिल पाटील, महेश पाटील, हरलाल कोळी, संदीप सावळे शहराध्यक्ष दिलीप पाटील, रजनीकांत बारी आदी यावेळी उपस्थित होते.