रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथे महिलेवर कोल्ह्याचा हल्ला...

अनामित

संग्रहित छायाचित्र

रावेर तालुक्यातील अहिरवाडी गावातील एका महिलेवर कोल्ह्याने हल्ला केला असून चार पाळीव बकऱ्या फस्त केल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भिती चे वातावरण पसरले आहे. तर आहीरवाडी गावत असलेल्या जखमी महीलेचे नाव सगुणाबाई तायडे असे आहे [ads id='ads1]


त्या घरात झोपलेल्या होत्या त्यावेळी यांच्यावर कोल्हाने हमला केला यात महिलेच्या डोळ्याच्या खाली मोठी दुखापत झाली असल्याची प्राथमिक माहीत वनविभागाच्या वतीने देण्यात आली आहे .तर रावेर तालुक्यातील काल पुन्हा चार पाळीवर बकर् ही या कोल्हाने फस्त केल्या असून हल्ला करण्याचे सत्र मागील अनेक दिवसां पासुन सुरु आहे. नागरीकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

भारतीय कोल्हा विषयी थोडक्यात माहीत

भारतीय कोल्हा (शास्त्रीय नाव कॅनिस ऑरिअस इंडिकस) इंग्रजी: (इंडियन जॅकल ) हा भारतीय उपखंडातील पाकिस्तान, भारत, नेपाळ व बांग्लादेश या देशात आढळणारा मांसाहारी वर्गातील सस्तन प्राणी आहे. तो भारतात हिमालयाच्या पायथ्यापासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र आढळतो.


भारतीय कोल्हा शास्त्रीय वर्गीकरण
वंश - कणाधारी
जात - सस्तन
वर्ग - मांसभक्षक
कुळ - श्वानाद्य कुळ
जातकुळी  - Canis
जीव  - C. aureus
शास्त्रीय नाव - C. a. indicus

भारतीय कोल्ह्याची उंची ३८–४३ सेंमी, 
डोक्यासकट शरीराची लांबी ६०–७५ सेंमी.; 
शेपूट  २०–२७ सेंमी.; 
वजन  ८–११ किग्रॅ. असते. उत्तर भारतातील कोल्हे सर्वसाधारणपणे मोठे असतात. कोल्ह्याचे लांडग्याशी बरेच साधर्म्य असले, तरी लांडगा जास्त उमदा दिसतो. कोल्ह्याचा रंग भुरकट तपकिरी काळसर असतो. रंग भोवतालच्या भौगोलिक व हवामानाच्या परिस्थितीप्रमाणे बदलतो. खांदे व कान यांच्याजवळील आणि पायांचा रंग काळा, पांढरा व पुसट पिवळसर यांचे मिश्रण असतो. हिमालयातील कोल्ह्यांचा रंग जास्त पिवळसर पण कानांवर व पायांवर पिवळा रंग जास्त गडद आणि काळपट असतो.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!