रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे) रावेर तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांना रावेर तहसीलदार कार्यालया मार्फत स्वतंत्र्य शिधापत्रिका व दिव्यांग बांधवांना अंतोदय कार्ड मध्ये सामील करण्यासाठी 2018 पासून तहसीलदार कार्यालय रावेर येथे वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा आज पर्यत आश्वासन मिळाले पण दोन महिन्यापासून शिधा पत्रिके साठी अर्ज भरून दिव्यांग बांधवांना आज ना उद्या शिधापत्रीका देतो असे
[ads id='ads1]
आश्वासन पुरवठा अधिकारी बोलत असतात आणि आम्ही दिव्यांगन अशा प्रकारची भटकंती करून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न पुरवठा विभाग अधिकारी यांच्याकडून वेळोवेळी प्रयत्न केला जात आहे यासाठी सर्व दिव्यांग बांधवांनी त्यांच्या ऑफिस च्या पुढे ऑफिस बंद असलेल्या कुलुपाला हार घालून आपला निषेध जाहीर केला
यावेळी रजनीकांत शामराव बारी भारतीय जनता पार्टी दिव्यांग आघाडी तालुकाध्यक्ष रावेर, महेश महाजन शहराध्यक्ष रावेर, बिजलाल पाटील, पवन शिरनामे. प्रदीप परदेशी सामाजिक कार्यकर्ते उपस्थितीत होते
