गुणवत्ता हीन टिशु रोपांची चौकशी होऊन शेतकऱ्यांनान्याय मिळावा सोपान बाबुराव पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी किसान सभा

अनामित

रावेर तालुका प्रतिनिधी (राजेश रायमळे) तालुक्यासह टिशु केळीची रोपे रोग प्रतिकार शक्ती नसल्याने केळीवर अनेक रोग पडुन शेतक-यांची फसवणुकीची चौकशी होवुन कार्यवाही होण्याबाबतची मागणी, सोपान पाटील याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव जिल्ह्यात रावेर,यावल, मुक्ताईनगर, चोपडा तालुक्यासह अनेक वर्षांपासून केळीची लागवड होत असते.
[ads id='ads1]

पुर्वी शेतकरी पारंपरिक केळी खोडाचे कंदाची लागवड करीत आसत.व शेणखत रासायनिक खते अल्प प्रमाणात खर्च करून उत्तम प्रकारे केळी पिक घेवुन अधिकचे उत्पन्न शेतकरी घेत असत. कालांतराने जैन कंपनी सह अनेक कंपन्यांनी टिशु (ऊती संवर्धक.) G9 केळीची महागडी टिशु रोपें शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली.टिशु लागवड केल्यानंतर त्याचा उत्पादन खर्च खूपच प्रमाणात वाढ झाली.


टिशु साठी ड्रिचींग किटक नाशकची फवारणी जैविक रासायनिक खते यांच्या मात्रांचा खर्च वाढला. त्यामुळे पुर्वी उत्पादनात वाढ झाली. जास्तीचे भावही शेतकरी वर्गास मिळु लागले. त्यामुळे पुढे केळीच्या लागवड क्षेत्राच्या निम्म्यापेक्षा जास्त शेतकरी टिश्यू रोप अँडव्हान्स बुकिंग करू लागले . कंपन्या रोपांची उत्पादन क्षमता नसताना जास्तीचे बुकिंग घेऊ लागल्या त्यामुळे तिन चार वर्षांपासून टिशु रोप रोग प्रतिकार शक्ती नसलेली रोपे कंपनी देत असल्याने केळी वर आयुष्यात किड आळी कधी शेतकऱ्यांनी पाहीली नव्हती ती आता पहावयास मिळते, त्यामुळे केळीवर.कुकूंबर मोझ्याक सि.एम.व्ही,खोडकिडा, , करपा यासह अनेक प्रकारचे रोग या तीनचार वर्षात सततचे पडू लागले आहे.अनेक कृषी तज्ञ शास्रज्ञांनी पाहाण्या केल्या.


परंतु कंपन्यांनी काहीही सुधारणा केल्या नाहीत जळगावला केळी संशोधन केंद्र आहे. त्या अधिकारी वर्गाने सुध्दा या बाबी अनुभवल्या आहे.जैन कंपनीसह सर्वच कंपन्या केळी तज्ञाना जुमानत नाही. लोक प्रतिनिधी फक्त पहाणी दौरे करतात परंतु तक्रारी करीत नाही ? गोडबंगाल असते व अधिकारी वर्ग यांच्यावर कार्यवाही करीत नाही, त्यामुळे जळगाव जिल्हयातील रावेर यावल तालुक्यासह सर्वच तालुक्यात या वर्षीही केळीवर केळीवर कुकूंबर मोझ्याक, खोडकिडा. सिएमव्हीसह अनेक प्रकारचे रोग पडलेले असल्याने शेतकरी आज आडचणीत आहे दरवर्षी प्रमाणे कंपन्याचे आधिकारी महागडी केळी टिशु रोपें शेतकऱ्यांना उपडुन नष्ट करण्याचा व महागडी औषधे फवारणीचा सल्ला देवुन शेतकरी वर्गास आर्थिक भुर्दंड देत आहेत. 
 केळीच्या टिशु रोपांची तीन ते चार वर्षात कोणतीच गुणवत्ता किंवा रोग प्रतिकार क्षमता कंपन्यांनी सुधारलेली नाही त्यामुळे महागडे रोपे मशागत लागवड ड्रिचींग औषध फवारण्या सर्वच जास्तीचे खर्च करावे लागत आहे,त्यामुळे शेतकरी वर्गाची खुप मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक होत 


असल्याने वरीष्ट पातळीवरुन या सर्व गंभीर बाबीची दखल घेवुन चौकसी समीती नेमुन सर्व प्रकराची चौकसी होवुन केळी उत्पादक शेतकरी वर्गास न्याय मिळण्यासाठी कंपनी मार्फत नुकसान भरपाई देण्यात यावी व भविष्यात असी रोग प्रतिकार शक्ती नसलेली रोपे कंपनी देणार नाहीत याबाबत सुद्धा कंपन्याना ताकीद द्यावी व केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा व शेतकरी हीताचा निर्णय़ व्हावा ही आग्रहाची विनंतीचे निवेदन सोपान पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी किसान सभा जळगाव यांनी केद्रीय कृषी मंत्री मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री, कृषी राज्यमंत्री,सुप्रिया सुळे खासदार बारामती, फलोत्पादन मंत्री,फलोत्पादन राज्यमंत्री ,प्रधान सचिव कृषी,प्रधान सचिव फलोत्पादन इत्यादींना वरील मागणीचे निवेदन दिले आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!