रावेर प्रतिनिधी (राजेश रायमळे) जळगांव जिल्ह्य़ातील रावेर हे तालुक्याचे ठिकाण असून रावेर यावल व रावेर मुक्ताईनगर विधान सभा मतदार संघ तसेच रावेर लोकसभा मतदारसंघ आहे. तसेच रावेर हे तालुक्याचे ठिकाण असून थेटे उपजिल्हा रुग्णालय होण्यास सुयोग्य ठिकाण असूनदेखील जेथे उपजिल्हा रुग्णालयासाठी जागा देखील उपलब्ध नसतांना रावेर मतदार संघातील यावल तालुक्याची शिफारस चुकिच्या पध्दतीने केली गेलेली आहे.तरी सुयोग्य ठिकाण रावेर येथेच ऊपजल्हा रुग्णालय व्हावे अशी मागणी पाटील यांनी निवेदनाद्वारे केली.याबाबत सविस्तर वृत्त असे की,
[ads id='ads1]
जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय होण्याबाबत उपमुख्यमंत्री,जलसंपदा मंत्री,आरोग्य मंत्र्यांनी सिफारसी करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहे
अनेक दिवसांपासून प्रस्ताव पडून होते. संचालक आरोग्य सेवा सेवा मुंबई यांचे पत्र क्र. संआयसे/कक्षा/टेलीफोन/अए/बृहत आराखडा/बैठक/३४०४६-६५/१७दि.०४/१०/२०१७
२) आपल्या कार्यालयाचे पत्र क्र. उपआसे/नि
यो-१/बृहत आराखडा/बैठक/३८५०९-१४/१७ दिं. ०२/११/२०१७
३) जाक्रं/ सारुज/श्रेणी
वर्धन/२०५०४-६५/१७दिंनाक २१/१३/२०१७ जिरुज श्रेणी वर्धन अ क्र ५ नुसार ३०खाटांवरुन १००खाटांचे श्रेणी वर्धन होण्याबाबतचा प्रस्तावास मजुरीची सविस्तर मागणी जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात अनेक वेळा वरीष्ठांकडे मागण्या करुन रावेर ग्रामीण रुग्णालयास श्रेणीवर्धन होण्याची सिफारसीस्तव प्रस्ताव सादर असुनही बृहत आराखड्यानुसार श्रेणी वर्धन झाले नाही चुकीचे पध्दतीने रावेर मतदारसंघातील यावल तालुक्याची सिफारस केली गेली
तिथे अद्याप जागासुध्दा उपलब्ध नाही तसेच रावेर उप रुग्णालयात ५ एकर जमीन असुन दोन ते मोठ्या इमारती आहेत कमी खर्चात इथंच उपरूण्णालय होणे आवश्यक होते.तसेच जळगाव पासुन ७०कि.मी.लांब रावेर तालुक्यात जनतेला आजही आपला जीव वाचविण्यासाठी धडपड करावी लागत आहे रावेर तालुक्यात आदिवासी गावे २२ त्यात अतिदुर्गम भागात वाड्यावस्त्या आहेत त्यांना प्राथमिक उपचार उपलब्ध होत
नसल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तसेच मध्य रेल्वे मार्गावर वाघोडा, रावेर, निभोंरा, सावदा ही चार रेल्वे स्टेशन असल्याने लांबच्या मार्गावर अनेक दुर्दैवी प्रसंग घडत असतात त्यानाही वेळेवर उपचार मिळत नसल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तसेच तापी नदीवर हातनुर धरण असल्याने लांब पर्यंत ब्याक वाटर साजते त्यात अनेक दुर्दैवी लोकांना प्राथमिक उपचार उपलब्ध होत नसतात व अकंलेश्र्वर बुरहानपुर वर्दळीचा राज्यमार्गावर सततच्या अपघातात अनेकांना प्राथमिक उपचार उपलब्ध होत नसल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तसेच यादिडवर्षात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त होते.
त्या त्यामुळे तालुक्यातील जनता भयभीत झालेला आहे या सर्व बाबींचा शासनाने योग्य तो विचार करून त्वरीत रावेर ग्रामीण रुग्णालयास श्रेणी वर्धन करून ३० खांटावरुन १०० खांटाचे उपजिल्हा रुग्णालय खासबाब त्वरित मजुंर करण्या बाबत आग्रहाची विनंतीचे निवेदन सोपान बाबुराव पाटील
जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी किसान जळगाव यांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, आरोग्य मंत्री, पालकमंत्री ,सुप्रीया सुळे खासदार बारामती यांना दिले.
