धक्कादायक - १४ वर्षीय पीडितेने बाळाला जन्म देताच जिवंतच विहिरीत फेकले

अनामित


मध्य प्रदेश MP - अशोकनगर येथील परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तर याठिकाणी वय १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत मागील काही महिन्यांपासून गँगरेप झाल्याचा प्रकार उघड झालं आहे. मुलीवर तिचा मावस भाऊ आणि त्याचे ४ मित्रांनीच अत्याचार करत होते. 

[ads id='ads1]

जेव्हा या पीडित मुलीनं एका चिमुकलीला जन्म दिला आणि नवजात मुलीला विहिरीत फेकून दिले तेव्हा या प्रकरणाचा संपूर्ण खुलासा झाला. संबंधित प्रकरणातील ५ आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या प्रकरणात २ आरोपी अल्पवयीन आहेत. दिनांक २० सप्टेंबर रोजी कदवाया गावात हनुमान मंदिराजवळील एका विहिरीत नवजात बालकाचा मृतदेह सापडला आणि लोकांनी हा मृतदेह पाहताच तात्काळ जवळील पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नवजात बालकाचा मृतदेह बाहेर काढला आणि या घटनेचा गुन्हा दाखल करून घेतला.

नवजात मुलीच्या मृतदेहाचं पोस्टमोर्टम 

पोलिसांना मृतदेह हा विहिरीच्या बाहेर काढून त्या नवजात मुलीच्या मृतदेहाचं पोस्टमोर्टम करण्यात आलं. यावेळी या मुलीला जिवंतच विहिरीत फेकून दिलं त्यानंतर पाण्यात बुडून चिमुकलीचा मृत्यू झाला. प्रकार समोर आला या या नंतर पोलिसांनी या घटनेचा तपास करताच अलीकडेच गावात १४ वर्षीय मुलीनं एका चिमुकलीला जन्म दिल्याचं कळालं. त्यानंतर पोलिसांनी संबंधित मुलीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली . तेव्हा मुलीनं पोलिसांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. पोलिसांनी या मुलीला बालसुधारगृहात पाठवलं आहे


मुलीनं पोलिसांना सांगितली हि धक्कादायक घटना 

 ऑक्टोबर २०२० मध्ये एकेदिवशी घरात एकटी होती. वडील शेती काम करायचे पीडित मुलगी लहान असतांनाच तीची आईचा मृत्यू झालेला होता वडील शेतात गेले असता एके दिवशी पिडीत मुलगी ही घरी एकटीच होती , तेव्हा गावातच राहणारा मावस भाऊ छोटू विश्वकर्मा घरी आला. छोटूनं पाहिलं असता घरात कुणीच नव्हतं

[ads id='ads2]

 त्यानंतर छोटूनं तिच्यासोबत अतिप्रसंग केला. त्यानंतर मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. जर ही गोष्ट बाहेर कुणाला कळाली तर तुला ठार करेन असं छोटूनं सांगितलं. त्यानंतर पुन्हा छोटूनं पीडितेला बाहेर घेऊन गेला. तिथं त्याचा मित्र राहुल देखील होता. दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. 


नंतर अन्य ३ जणांसोबत पीडितेला संबंध ठेवण्यास भाग पाडलं. मागील ११ महिन्यापासून आरोपींनी या पीडितेवर अतिप्रसंग केला. त्यावेळी ही पीडित मुलगी गर्भवती झाली. वडिलांचं या गोष्टीकडे लक्ष नव्हतं. मात्र २० सप्टेंबरला ती शौचालयाला गेली असता तेव्हा तिची डिलिव्हरी झाली. आणि ती खबरली त्या वेळी भीतीपोटी पिडीत मुलीनं नवजात मुलीला विहिरीत फेकून दिले. 


या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी २५ सप्टेंबरला छोटू, राहुल, सचिनसह अन्य दोन अल्पवयीन मुलांना अटक केली. पोलिसांनी आरोपींविरोधात ३७६ आणि पॉस्को अंतर्गत कारवाई केली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!