रावेर - नेहमी पेट्रोल भरण्यापूर्वी मीटरचं रिडींग शून्य असणं गरजेचं तपासून घ्या पण त्या आधी स्वयंचलित पुरवठा अहवाल स्लिप बील घेणही विसरू नका मात्र रावेर शहरात असलेल्या ब-हाणपुर रोड वरील छोरिया माार्केट च्या पुुढे असलेले हिंन्दुस्तान पेट्रोलियम (HP) च्या पेट्रोल पंपचे कर्मचारी बील मागणी केली की मशीन खराब असल्याचे सांगतात.
[ads id='ads1]
सविस्तर वृत्त असे की पेट्रोल पंपमध्ये पेट्रोल मीटरच्या खाली एक छोट्या स्वरुपात पेट्रोल बिल मशीन असते तेथुन पेट्रोल भरल्यानंतर बील मशीनमधून बाहेर पडणाऱ्या स्लिपमध्ये तेवढेच इंधन रेकॉर्ड केले जाते आणि तेवढेच वाहनात टाकले असते पेट्रोल मशीनवरीलच बील मशिन आतुन एक बील पेट्रोल टाकणारा कर्मचारी काढुन देतो , तर रावेर येथील स्टेशन रोडला असलेले हिंन्दुस्तान पेट्रोलियम (HP) पेट्रोल पंपांचे कर्मचारी ५० रु असो अथवा १०० रु असो येथील कर्मचारी नियमित पणेे बिल मागणी केली की ग्रराहकांना बील पावती देतात, तर हे स्टेशन रोड येेेथील बिल पावती चे काही छायाचित्र आहेत.
![]() |
स्टेशन रोडवरील पेट्रोल पंप नियमित बील देत असल्याचे छायाचित्र |
मात्र रावेर येथील ब-हाणपुर रोड वर छोरिया माार्केट च्या पुुढे असलेल्या हिंन्दुस्तान पेट्रोलियम (HP) पेट्रोल पंपांचे कर्मचारी नेहमी पंपमध्ये मीटर बंद असल्याचे सांगतात, जर नेहमी अशेच उत्तर मिळाले तर डिझेल-पेट्रोल भरणाऱ्या ग्राहकांची ही देखील अशा परिस्थितीत फसवणूक होण्यापासुन नाकारता येणार नाही.
बील मिळाले नाही तुमचे लक्ष पेट्रोल डिझेल मीटर वर नसले तर प्रविष्ट केलेले इंधन हे ग्राहकांच्या स्लिपमध्ये जोडले जाते. आणि त्यात गाडी नंबर ही बहुतेक ठिकाणी प्रविष्ट केला जातो मग ती रु ५० असो अथवा २०० ची ती इंधन बील पावती ग्राहकांना दिली जाते, मात्र या पेट्रोल पंपांवर हे बील मशीनच खराब असल्याचे सांगतात सामन्य ग्राहकांना दुचाकीस्वरांना स्लिप दिलेच जात नाही, विचारणा केली तर या पेट्रोल पंप ला असलेले कर्मचारी म्हणतात
"पावती मिळणार नाही 100 रु ची पावती देते कोण मशीन खराब आहे". पुढच्या मशिन वर जा तेथुन बिल घ्या"
असे उत्तर ह्या पेट्रोल पंपावर मिळत आहे तर आधिच १०८ रु लिटर पेट्रोल चा ग्राहकांना फटका त्यात बिल देण्यास नकार काय करावे ग्राहकांनी तर या सर्व प्रकारांची संबंधित प्रशासकीय यंत्रणेने गुप्त ऑपरेशन करुन अश्या पावती न देण्याची भाषा करणार्यांना धडा शिकवला पाहीजे अशी आशा सामान्य ग्राहक करीत आहे आणि तरच यातुन ९० % ग्राहक पेट्रोल डिझेल च्या फसवणूकी पासुन वाचतील सामान्य ग्राहका ला कुठल्याही वस्तूंते बिल घेणे हा अधिकार आहे
पेट्रोल ग्राहकांनी पंपावर या गोष्टीकडे लक्ष द्या
पेट्रोल भरण्यापूर्वी मीटरचं रिडींग शून्य असणं गरजेचं. भेसळ असल्याचा संशय असल्यास फिल्टर पेपर परीक्षण करण्याची मागणी करा. बील घेणं विसरु नका.