वाघ व बिबट कातडीची तस्करी करणाऱ्या आरोपींना सापळा रचून अटक पुणे वन विभाग आणि वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग(पश्चिम) मुंबई यांची मोठी कारवाई

अनामित

(विशेष प्रतिनिधी अ‍ॅड बसवराज होसगौडर) 

पुणे - दिनांक 14/9/21 रोजी पुणे वन विभागाच्या चमूद्वारे भांबुर्डा वनपरिक्षेत्रातील मौजे वारजे येथे वन्यजीव गुन्हे नियंत्रण मुंबई यांच्याकडून मिळालेल्या गुप्त माहिती आधारे सापळा रचून बिबट प्रजातीच्या कातडीची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. 

कारवाईदरम्यान एक बिबट कातडी हस्तगत करण्यात आले व एक दोन चाकी गाडी जप्त करण्यात आली. प्रस्तुत प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली.सदर आरोपी ना ताब्यात घेण्यात आले. 
[ads id='ads1]         

  तसेच या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची सखोल चौकशी केली असता आणखी दोन कातडीं चा व्यवहार होणार असल्याचे निदर्शनास आले त्या अनुषंगाने दिनांक 15/09/ 21 रोजी सकाळी एक बिबट व एक वाघ सदृश्य कातडीचा व्यवहार करताना 5 आरोपींना सासवड (पुणे) येथून ताब्यात घेण्यात आले व त्या दरम्यान दोन चार चाकी वाहने जप्त करण्यात आली. 
         [ads id="ads2"]

उपरोक्त कारवाई पुणे वन विभागचे उपवनसंरक्षक श्री राहुल पाटील(भा.व.से.) व वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग मुंबई चे विभागीय उपसंचालक श्री योगेश वरकड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार डोकी आदीमलया वन्यजीव निरीक्षक, विजय नंदेश्वर, सप्पन मोहन, वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग (प.क्षे.), मुंबई, व प्रदिप संकपाळ वनपरिक्षेत्र अधिकारी भांबुर्डा (पुणे), वैभव बाबर वनपाल, सुरेश बर्ले, रामेश्वर तेलंग्रे, महादेव चव्हाण,रईस मोमीन, परमेश्वर वाघमारे, योगेश कोळी, अमोल साठे, अमोल गुरव यांच्या संयुक्त पथकाद्वारे कारवाई करण्यात आली. सदर वन गुन्ह्याचा पुढील तपास श्री राहुल पाटील उपवनसंरक्षक पुणे व श्री मयूर बोठे सहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे .

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!